आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खत्री हत्याकांडाची उद्या अंतिम सुनावणीची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- बिल्डर किशाेर खत्री हत्याकांडाच्या खटल्याची गुरुवार, २७ सप्टेंबरला अंतिम सुनावणीची शक्यता अाहे. बिल्डर किशाेर खत्री यांची ३ नाेव्हेंबर २०१५ राेजी साेमठाणा शेत शिवारात हत्या करण्यात अाली हाेती. खोलेश्वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून खत्री यांच्यावर गोळीबार केला हाेता. 


या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली हाेती. हत्याकांडाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली हाेती. याप्रकरणी जुनेशहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. पाोलिसांनी तपास करुन दाेषाराेप पत्र न्यायालयात सादर केले हाेते. या खटल्यात दाेन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर ११ नाेव्हेंबर व २४ नाेव्हेंबर राेजी अंतिम युक्तिवाद व निर्णयाची शक्यता हाेता. मात्र हे दाेन्ही िदवस टळले. अाता यावर २७ जुलै राेजी अंतिम युक्तिवाद किंवा निकाल जाहीर हाेण्याची शक्यता अाहे. 

बातम्या आणखी आहेत...