आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chandigarh High Court Engineer Student Could Not Pass The 9 Years Even BTech Exam

9 वर्षांतही इंजिनिअरिंग पास करू शकला नाही विद्यार्थी, जज म्हणाले- देशावर दया कर, इंजिनिअर बनू नको... जरी बनलास तरी जी इमारत बांधशील तिच्यात आग लागणे निश्चित...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - चंदिगड हायकोर्टाने एनआयटी कुरुक्षेत्रमधून 9 वर्षांपासून बीटेक उत्तीर्ण करू न शकणाऱ्या विद्यार्थ्याला चांगलेच फटकारले आहे. हायकोर्टाचे चीफ जस्टिस कृष्ण मुरारी म्हणाले की, तुम्ही कोर्टावर दया करून अमूल्य वेळ वाया घालवू नका. इंजिनिअर न बनून देशावर दया करा. जर तुम्ही 9 वर्षांत इंजिनिअरिंग पूर्ण करू शकला नाहीत, तर एका संधीत 17 कंपार्टमेंट कसे-काय क्लिअर कराल.

 

कोर्टाने विद्यार्थ्याला सल्ला दिला की, तुम्ही दुसरे एखादे प्रोफेशन निवडा..
ही अवस्था असेल तर इंजिनिअरिंग उत्तीर्ण करून जी इमारत बांधाल, त्यात आग लागणे तर निश्चितच आहे. कोर्टाने विद्यार्थ्याला सल्ला दिला की, दुसरे एखादे प्रोफेशन निवडा. वाटले तर वकिली करा, पण इंजिनिअरिंग करू नका.

 

विद्यार्थी 9 वर्षांतही होऊ शकला नाही पास

वास्तविक, विद्यार्थ्याने 2009 मध्ये अॅडमिशन घेतले होते. विद्यार्थी 9 वर्षांतही परीक्षा पास करू शकला नव्हता. त्याने पेंडिंग असलेले 17 कंपार्टमेंट पास करण्यासाठी आणखी एका वर्षाचा अवधी मागितला होता. याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत: युक्तिवाद करण्यासाठी चीफ जस्टिस यांच्या कोर्टात उभा झाला. यादरम्यान, तो म्हणाला की, 4 वर्षांच्या डिग्रीदरम्यान त्याचे अनेक कंपार्टमेंट्स क्लिअर करायचे राहून गेले. त्यासाठी आणखी 4 वर्षे देण्यात आली होती. परंतु खासगी कारणांमुळे त्याला तेव्हाही शक्य झाले नव्हते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...