आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरे म्हणतात - प्रियंका चतुर्वेदींचे काम दिसले, आमचे नाही; तरी मी कर्मठ शिवसैनिक, नाराज अजिबात नाही!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संधी मिळाली असती तर लढण्यासाठी बळ मिळाले असते, चंद्रकांत खैरेंची खदखद
  • ... तर महापालिकेवर भगवा फडकवणे आणखी सोपे झाले असते

औरंगाबाद - शिवसेनेने राज्यसभेचे उमेदवार म्हणून काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान चतुर्वेदींच्या उमेदवारीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला संधी मिळाली असती तर पक्षासाठी आणखी लढण्याचे बळ मिळाले असते अशी खदखद त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे. ... तर महापालिकेवर भगवा फडकवणे आणखी सोपे झाले असते 


खैरे म्हणाले की, मला माझी स्वतःशी महत्वाकांक्षा नाही. मी याआधी चार वेळेला खासदार झालो आहे. पण माझ्या समाजातील आणि मराठवाड्यातील लोकांना अपेक्षा होती. मी कडवट शिवसैनिक आहे. सुरुवातीपासून पक्षाची आणि जनतेची सेवा करत आलो आहे आणि यापुढेही करेन. औरंगाबाद महापालिकेवर भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही. पण राज्यसभेची खासदारकी मिळाली असती तर आणखी सोपे झाले असते, असेही खैरे म्हणाले. प्रियंका चतुर्वेदींचे काम दिसले, आमचे नाही


आदित्य ठाकरेंना प्रियंका चतुर्वेदी यांचे काम आवडले असेल. त्यामुळे त्यांनी त्यांनी उमेदवारी दिली असेल. आम्ही देखील मराठवाड्यासाठी खूप काम केले. पण आमचे काम त्यांना दिसत नाही. प्रियंका चतुर्वेदी नक्कीच खूप चांगलं काम करतील, असा विश्वासही खैरंनी यावेळी व्यक्त केला. आपली नाराजी पक्षप्रमुखांना बोलून दाखवणार का यावर बोलताना ते म्हणाले की, मला माझी स्वतःशी महत्वाकांक्षा नाही. मी याआधी चार वेळेला खासदार झालो आहे. पण माझ्या समाजातील आणि मराठवाड्यातील लोकांना अपेक्षा होती. मी स्वतःहून उद्धव ठाकरेंकडे जाणार नाही, त्यांनी बोलावले तर नक्की जाईन. बातम्या आणखी आहेत...