आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंद्रबाबू नायडू पक्ष बदलण्यात सीनिअर, सासरे एनटीआर यांच्या पाठीत खंजर खुपसला -पीएम मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंटूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुंटूर येथील सभेला संबोधित करताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यावर हल्लाबोल केला. केंद्र सरकारवर विश्वासघाताचे आरोप करणारे चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या सासरे एनटीआर यांच्या पाठीत खंजर खुपसला होता अशा स्वरुपाची टीका मोदींनी केली. ते रविवारी बोलत होते. गेल्या वर्षी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख नायडू यांनी भाजपशी युती तोडली. त्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच आंध्र प्रदेश दौरा आहे. त्यांच्या दौऱ्याच्या विरोधात मुख्यमंत्री नायडूंच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली आहेत. अनेक ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले.

 

चंद्रबाबू सर्वच बाबतीत सीनिअर आहेत -पीएम
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुंटूर येथील सभेला संबोधित करताना म्हणाले, "चंद्रबाबू नायडूंनी आंध्र प्रदेशात Sunrise अर्थात सूर्योदयाचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात ते आपल्या Son अर्थात मुलाच्या उगवण्याच्या नादात लागले. त्यांनी आंध्र प्रदेशच्या गरीबांना नव-नवीन योजनांचे आश्वासन दिले होते. परंतु, मोदींच्या योजनांवरच आपल्या नावाचे स्टीकर लावण्यास सुरुवात केली." याही पुढे जात पंतप्रधान मोदी म्हणतात, "नायडू सर्वच बाबतीत जास्त अनुभवी आणि ज्येष्ठ आहेत. ते नवीन-नवीन पक्षांसोबत आघाड्या करण्यात सीनिअर आहेत. ते आपलेच सासरे एनटीआर यांच्या पाठीत खंजर खुपसण्यात सीनिअर आहेत. एका निवडणुकीनंतर दुसऱ्या निवडणुकीत पराभूत होण्याच्या बाबतीत सुद्धा ते सीनिअर आहेत."

बातम्या आणखी आहेत...