आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबांपेक्षा 6 पटींनी श्रीमंत आहे अवघा 3 वर्षांचा नातू, 18.71 कोटींच्या प्रॅापर्टीचा आहे मालक...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांचे सुपुत्र नारा लोकेश यांनी अमरावतीमधील त्याची प्रॅापर्टी जाहीर केली आहे. त्यानुसार त्यांच्या वडिलांची प्रॅापर्टी 2.99 कोटी आहे, तर त्यांचा मुलगा देवांशची प्रॉपर्टी 18.71 कोटी रुपये आहे. म्हणजेच हा अवघा 3 वर्षांचा नातू त्याच्या आजोबांपेक्षा 6 पटींनी जास्त श्रीमंत आहे. 

 

आजोबांपेक्षा 6 पटीने जास्त श्रीमंत आहे
- नायडू परिवारातील 5 सदस्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे, जी अंदाजे 81 कोटी रुपये आहे. यानुसार कुटुंबातील सर्वात छोटा देवांश त्याच्या वडील आणि आजोबांपेक्षाही जास्त श्रीमंत आहे.

 

- देवांशच्या नावावर हैराबादच्या पॉश वस्तीतील जुबली हिल्समध्ये 1325 स्क्वेअर यार्डचा प्लॉट आहे. या प्लॉटची किंमत 16.17 कोटी आहे, त्याव्यतिरिक्त त्याच्या नावावर पीएनबी हाउसिंग फायनान्समध्ये 2.49 कोटींचे फिक्स डिपॉझिट आहे.
 
- देवांश खूप लक्झरी लाइफ जगतो. त्याच्या चांदीच्या पाळण्याची किंमत 2.87 लाख रुपये आहे, तर त्याच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये 2.47 लाख रुपये कॅश आहेत. त्याची मागच्या वर्षी जाहीर झालेली संपत्ती 11.54 कोटी रुपये होती.

 

आजोबाजवळ इतकी प्रॅापर्टी
- चंद्राबाबू नायडूंच्या प्रॉपर्टीत हैदराबादमध्ये असलेला त्यांचा 8.96 कोटींचा बंगला आहे, त्याव्यतिरिक्त त्यांच्या मूळ गावात 23.84 लाखांचे घर आहे.  

 

- नायडू अॅम्बेसेडर कार चालवतात जिची किंमत फक्त 1.5 लाख आहे, तर त्यांच्या बँक अकांउटमध्ये 4.83 लाख रुपये आहेत; परंतु त्यांच्यावर 5.31 कोटींचे कर्ज आहे. म्हणून ते हटवले तर त्यांची एकूण प्रॅापर्टी 2.99 कोटी रुपये एवढी होते.
 
- तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंनीच आपल्या कुटुंबाची संपत्ती जाहीर करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील संपत्तीच्या खुलाशात पारदर्शकता असल्याचा दावा केला आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...