आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टात टेक्नोक्रेट्सची याचिका रद्द, 20 विरोधी पक्ष निवडणूक आयोगाला भेटणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एक्झिट पोल्समध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना पाहून विरोधी पक्ष ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ते 50% ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधल्या चिठ्याच्या तपासणीची मागणी करत आहेत. यासाठी 20 विरोधी पक्षांचे नेते आज दुपारी निवडणूक आयोगाशी चर्चा करणार आहेत. या दरम्यान सुप्रीम कोर्टाने 100% ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांच्या तपासणीसाठी दाखल केलेली याचीका रद्द केली आहे. कोर्ट म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि निवडणूकांच्या मध्ये आम्ही येणार नाहीत. ही याचिका काही टेक्नोक्रेट्सने दाखल केली होती.

 

तिकडे, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी ऐनवेळी दिल्ली दौरा रद्द केला. आधी तेही विरोधी पक्षांसोबत निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी जाणार होते, पण अजून हे स्पष्ट झाले नाही की, त्यांच्या जेडीएस पक्षाकडून विरोधी पक्षांच्या यादीत कोणी जाणार आहे का नाही. 


अफजाल अंसारींचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले
उत्तरप्रदेशच्या गाजीपूरवरून महाआघाडीचे उमेदवार अफजाल अंसारी यांच्याकडून ईव्हीएमच्या सुरक्षेवर आरोप लावण्यात आले होते, ते आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. आयोगाकडून सांगण्यात आले की, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटला पक्षांच्या नेत्यांसमोर सील करण्यात आले आहे, त्यासोबतच याची व्हिडिओग्राफीदेखील करण्यात आली आहे. तसेच स्ट्रॉन्ग रूमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि सीएपीएपचे जवानदेखील तैणात करण्यात आले आहे. त्यामुळेच आयोग म्हणाला की, सगळे आरोप तथ्यहीन आहेत. याआधी त्याने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्तित करून स्टॉन्ग रूमच्या बाहेर गोंधळ केला होता. या जागेवर बाहुबली नेता मुख्तार अंसारीचे भाउ अफजालचा केंद्रीय मंत्री मनोज सिन्हासोबत थेट सामना आहे.


एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीतील 10 पैकी 9 एक्झिट पोल्सनी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 18 मे रोजी नायडूंनी ईव्हीएम ऐवजी व्हीव्हीपॅटने मतमोजणी करण्याची मागणी केली होती. त्यांच्याशिवाय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, आप नेते संजय सिंह, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, काँग्रेस नेते राशिद अल्वी, माकपा महासचिव सीताराम येचुरी, राजद नेते तेजस्वी यादव यांनीदेखील एक्झिट पोल्स आणि ईव्हीएमवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.

बातम्या आणखी आहेत...