आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायकल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत अंदेली

केरबाला परिस्थितीमुळे मुलासाठी सायकल घ्यायची होती. आणि सायकल मिळाली, पण दैवानं डाव साधला...
 
तात्या माझ्या सायकलचं काय झालं? मी पाचवीत गेल्यावर देतो म्हणाला होतात. मला आता रोज चार चार किलोमीटर चालत जावं लागतं. चालल्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही’. रडवेल्या चेहऱ्यानं गणूनं वडील केरबाला विचारले. ‘आवं आणा की एकादी सेकंड हँड सायकल. तालुक्याला आपला इस्माईल हाय. त्याला सांगावा धाडा. देईल तो.’केरबाची बायको त्याला म्हणाली. 

‘अगं मी त्याला कवाच सांगितलंय. पण जरा चांगली सेकंड हँड सायकल मिळाली पायजेल नं? अन आपल्याला परवडाया बी पायजे. परवा तालुक्याला जातू तवा विचारतो.’ केरबा म्हणाला. त्याला सायकलचा विषय वाढवायचा नव्हता. शेतात जेमतेम पीक होतं. येणाऱ्या पैशाच्या हिशोबात सायकलचा खर्च अवघड होता. अन एक दिवस इस्माईलचा निरोप आला. एका डॉक्टरच्या मुलाची सायकल होती. इस्माईलकडे डॉक्टरांचा मुलगा सायकल रिपेअरिंगसाठी येत असल्यामुळे इस्माईलची आणि डॉक्टरांची चांगली ओळख झाली होती. एक दिवस इस्माईलने केरबाची व्यथा डॉक्टरला सांगितली. डॉक्टरांनी स्वखुशीनं ती सायकल केरबाला द्यायला सांगितलं. केरबाकडून केवळ दुरुस्तीचे पैसे इस्माईलनं घ्यावे अशी ताकीदही डॉक्टरांनी त्याला दिली. सांगावा येताच गणू आनंदानं नाचू लागला. केरबा गणूला घेऊन तालुक्याला गेला. केरबानं सायकल एसटीच्या टपावर नीट बांधून ठेवली. सायकल पडू नये म्हणून आजूबाजूला असलेली सामानाची पोती सायकलच्या आसपास आधारासाठी ठेवली. एसटी गावच्या दिशेने निघाली. मोठ्या रस्त्यावरून जात असताना अचानक मोठा जमाव दगडफेक करत आला. प्रसंगावधान राखत चालकाने एसटी विरुद्ध दिशेने नेली. विरुद्ध दिशेनंही एक जमाव बसवर दगडफेक करत आला. बसमधला जो तो वाट दिसेल तिकडे पळत सुटला. तेवढ्यात जमावाने एसटीवर पेटते बोळे टाकले. क्षणात एसटीवरच्या सगळ्या सामानानं पेट घेतला. चालकानं गाडी लगेच गाडी थांबवली. प्रवासी जीव मुठीत धरून पळत होते. एसटीवरचा सगळा माल जळत होता. ते पाहून गणू ओरडू लागला. ‘तात्या माझी सायकल. तात्या माझी सायकल.’ पण त्या वेळी सायकलपपेक्षा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे होते. केरबा गणूला घेऊन पळू लागला. दोघंही वळून वळून सायकलकडे पाहत होते. सायकल जळताना पाहून दोघांच्याही गालावरून अश्रू ओघळत होते.

लेखकाचा संपर्क : ९९२१६३०९४४
 

बातम्या आणखी आहेत...