आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत चंद्रकांत खैरे यांचा पराभव; उर्वरित मराठवाड्यात युतीचेच वर्चस्व

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यातील लाेकसभेच्या ८ पैकी ६ जागा पटकावत शिवसेना- भाजप युतीने २०१४ प्रमाणे याही वेळी या भागात आपले वर्चस्व कायम राखले. मात्र, गेल्या वेळी माेदी लाटेतही दाेन जागा पटकावून अस्तित्व कायम राखणाऱ्या काँग्रेसचे यंदा पानिपत झाले. दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांना नांदेडमधून पराभवाचा धक्का बसला, तर हिंगाेलीची जागाही शिवसेनेनेही काॅंग्रेसच्या ताब्यातून हिसकावून आणली. बीड, जालना, लातूरसह नांदेडमध्ये भाजपने दमदार विजय मिळवला. मात्र, सलग चार टर्म औरंगाबादेतून विजय मिळवणारे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंना यंदा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभवाची धूळ चारली. 

 

औरंगाबाद : इम्तियाज जलील (एमआयएम)

सेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा इम्तियाज यांनी ४४९२ मतांनी पराभव केला.

 

जालना : रावसाहेब दानवे (भाजप)

काँग्रेसचे विलास औताडे यांचा पराभव करत दानवे पाचव्यांदा लाेकसभेत.

 

बीड : डाॅ. प्रीतम मुंडे (भाजप)

राष्ट्रवादीच्या बजरंग साेनवणेंवर मात करत मुंडे दुसऱ्यांदा लाेकसभेत. 

 

लातूर : सुधाकर शृंगारे (भाजप)

काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा पराभव करत शृंगारे प्रथमच लाेकसभेत दाखल.

 

उस्मानाबाद : ओमराजे निंबाळकर (सेना)

राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह या चुलत भावाला पराभूत केले.

 

नांदेड : प्रताप चिखलीकर (भाजप)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाणांना पराभूत करून चिखलीकर लाेकसभेत.

 

परभणी : संजय जाधव (शिवसेना)

राष्ट्रवादीचे समीर विटेकर यांचा पराभव करुन जाधव दुसऱ्यांदा बनले खासदार.

 

हिंगाेली : हेमंत पाटील (शिवसेना)

काँग्रेसचे सुभाष वानखेडेंना पराभूत करून पाटील यांनी बालेकिल्ला परत मिळवला. 

बातम्या आणखी आहेत...