आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादांविरुद्ध मनसेला सर्वपक्षीय पाठिंबा, अॅड. किशाेर शिंदेंना काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानीचे बळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविराेधात सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अॅड. किशाेर शिंदे यांना सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे पाठबळ मिळाल्यामुळे काेथरूडमध्ये अॅड. शिंदे यांचे पारडे जड झाले असून चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमाेर आव्हान निर्माण झाले आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटील यांच्याविराेधात उमेदवार उभा करण्यासाठी अनेक जणांना विचारणा झाली. परंतु तुल्यबळ उमेदवार मिळत नसल्याने त्यांनी मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसेच्या उमेदवाराला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, आघाडीद्वारे काेथरूड विधानसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात येईल, असाही विचार सुरू हाेता. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चाैधरी यांना उमेदवारीसाठी विचारणा केली, परंतु चाैधरी यांना आघाडीचे पाठबळ मिळेना तसेच मनसेने त्यांचा उमेदवार आधीच घाेषित केल्याने मतांचे विभाजन हाेईल आणि सर्व पक्षांत एकमत नसल्याने निवडणूक न लढण्याचा निर्णय चाैधरी यांनी घेतला. परंतु त्यानंतर वरिष्ठ पातळीवर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी बाेलणी करून काेथरूडच्या उमेदवाराला पाठिंबा मिळावा या दृष्टीने प्रयत्न केले. त्यानुसार संबंधित पक्षांनी एकत्र येत अॅड. शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचे घाेषित केले.

  • दादा, घरजावई हाेऊ नका : शिंदे

किशाेर शिंदे म्हणाले, ‘पाटील हे पुण्याचे जावई असून त्यांनी घरजावई हाेण्याचा प्रयत्न करू नये. यंदा काेथरूडची निवडणूक एेतिहासिक हाेणार आहे. काेथरूडकरांना गृहीत धरून विजयाचा दावा केला जात असून त्यांना मतदानाच्या दिवशी काेथरूडकरांची ताकद दाखवून देऊ. एका मताने का हाेईना मतदारांच्या जिवावर मीच निवडून येईन. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.’

बातम्या आणखी आहेत...