आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर, राज्यपालांनी तो रद्द करावा- चंद्रकांत पाटील

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'नियमबाह्य काम आम्ही होऊ देणार नाहीत'

मुंबई- उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सहा आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु आता या शपथविधी सोहळ्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेला महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटील म्हणाले की, "नव्या सरकारने अनेक नियम धाब्यावर बसवले असून भाजप याबाबत दाद मागण्यासाठी राज्यपालांकडे याचिका दाखल करणार आहे. तेथे न्याय मिळाला नाही, तर आमची सुप्रीम कोर्टातही जाण्याची तयारी आहे. राज्यपालांना आमची विनंती आहे की, त्यांनी हा शपथविधी रद्द करावा."

माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा बेकायदेशीर आहे. राज्यपालांनीदेखील त्यांना अनेकदा टोकलं. शपथविधीचीही एक पद्धत असते. त्यानुसारच शपथ घ्यावी लागते. परंतु नव्या सरकारकडून ठरलेल्या पद्धतीनुसार शपथ घेण्यात आली नाही. याविरोधात एकानं राज्यपालांकडे याचिका दाखल केली आहे. तसंच त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई न केल्यास सर्वोच्च न्यायालयातही याविरोधात याचिका दाखल होऊ शकते", असं ते म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, "उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आहे. आज दुपारपर्यंत अर्ज भरण्याची वेळ आहे. भाजपतर्फे किसन काथोरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. जर त्यांचा बहुमताचा विश्वास असेल तर त्यांनी गुप्त मतदान घ्यावे. त्यांचा विश्वास नाहीच म्हणून त्यांनी गेले महिनाभर आमदारांना कोंडून ठेवले आहे. त्यांचे मोबाइल काढून घेतले आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांशीसुद्धा संपर्क साधू दिला जात नाही. तरीही आमच्या या सरकारला शुभेच्छा आहेत. आम्ही प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करू."  

बातम्या आणखी आहेत...