Home | Maharashtra | Mumbai | Chandrakant Patil appointed as the President of BJP Maharashtra

चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती, दानवेंच्या मंत्रिपदी निवडीनंतर झाले फेरबदल

वृत्तसंस्था, | Update - Jul 16, 2019, 04:06 PM IST

उत्तर प्रदेशच्या भाजप कार्यकारिणीतही झाली खांदेपालट

  • Chandrakant Patil appointed as the President of BJP Maharashtra

    मुंबई - भाजपने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची निवड केली आहे. रावसाहेब दानवे यांची नुकतेच झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात मंत्रिपदी निवड झाली होती. त्यामुळे, दानवे यांच्या जागी भाजपने चंद्रकांत पाटील यांना नियुक्त केले आहे. यासोबतच भाजपने आपल्या उत्तर प्रदेश कार्यकारिणीमध्ये देखील बदल केला. ओबीसी नेते स्वतंत्र देव सिंह यांना उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. त्यांनी महेंद्र नाथ पांडे यांची जागा घेतली आहे. भाजपकडून मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

    मुंबई प्रदेशाध्यक्षही बदलला
    भाजपने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशासह मुंबईत सुद्धा बदल केले आहेत. त्यानुसार, आता मंगल प्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने येऊन ठेपले आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांसह पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. तसेच येत्या महाराष्ट्र विधानसभेत 'अबकी बार 220 पार' असा नवीन नारा दिला.

Trending