आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chandrakant Patil Had Shocked In Kolhapur; District Council President Post To Congress, Bajrang Patil Becomes President

कोल्हापुरात चंद्रकांतदादांना धक्का; जिल्हा परिषद अध्यक्षपद काँग्रेसकडे, बजरंग पाटील अध्यक्षपदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली : कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तांतर होऊन अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील, तर उपाध्यक्षपदी सतीश पाटील विजयी झाले. भाजपचे अध्यक्षपदाचे उमेदवार अरुण इंगवले, उपाध्यक्षपदाचे उमेदवार राहुल आवाडे यांचा १७ मतांनी पराभव केला. जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन महाविकास आघाडी भक्कम केली आहे. विजयी उमेदवारांना प्रत्येकी ४१, तर पराभूत उमेदवारांना २४ मते मिळाली.

अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी राजकीय खेळी खेळत भाजपला प्रथमच सत्ता प्राप्त करून दिली होती, परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने ही सत्ता पुन्हा एकदा प्राप्त केली आहे. शिवसेनेच्या १० सदस्यांनी काँग्रेस आघाडीला मतदान केल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांचा विजय सुकर बनला.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना काँग्रेसची १४, राष्ट्रवादीची १०, शिवसेनेची १०, शेतकरी संघटना दोन, शाहू आघाडी दोन, चंदगड विकास आघाडी एक, अपक्ष एक व ताराराणी बंडखोर आघाडी एक अशी एकूण ४१ मते मिळाली, तर भाजप आघाडीला भाजपची १३, प्रकाश आवाडे गटाची दोन, चंदगड युवक क्रांती एक, जनसुराज्य पक्ष सहा, ताराराणी आघाडी दोन अशी एकूण २४ मते मिळाली.
 

सांगली भाजपकडेच, जयंत पाटलांचे प्रयत्न अपयशी

सांगलीत भाजप उमेदवार प्राजक्ता कोरे व शिवाजी डोंगरे यांनी जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता कायम राखली.

नाशकात भाजपची माघार, अध्यक्षपद शिवसेनेकडे

नाशिक : महाविकास अाघाडीच्या फाॅर्म्युल्याच्या बळावर शिवसेनेने नाशिक जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखली. बाळासाहेब क्षीरसागर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली, तर राष्ट्रवादीचे डाॅ. सयाजी गायकवाड उपाध्यक्ष झाले. भाजपनेही अध्यक्षपदासाठी जगन्नाथ हिरे, तर उपाध्यक्षपदासाठी कन्हू गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. मात्र, एेनवेळी या दाेघांनीही अर्ज मागे घेतले. त्यामुळे क्षीरसागर व डाॅ. गायकवाड यांची बिनविराेध निवड झाली. यापूर्वीच्या अडीच वर्षांत शीतल सांगळे यांना अध्यक्षपद दिले हाेते, अाता क्षीरसागर यांना संधी मिळाली. हे दोघेही पहिल्यांदाच निवडून आले आहेत.

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांचे सांगली जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न भंग पावले असून आज झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्राजक्ता कोरे व शिवाजी डोंगरे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा १३ मतांनी पराभव करून भाजपने आपली सत्ता अबाधित राखली आहे.

भाजपच्या विजयात रयत विकास आघाडी, शिवसेना व शिवसेनेच्या अजित घोरपडे गटाची मोठी भूमिका राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पूर्ण राजकीय वर्चस्व लावले होेते. परंतु सर्व आघाडी नेते या खेपेला पुन्हा भाजपच्या पाठीशी उभे राहिले.

जिल्हा परिषदेत २६ सदस्य भाजपकडे होते. राष्ट्रवादी १५, काँग्रेस ८, रयत विकास आघाडी ४, शिवसेना ३, अजितराव घोरपडे गट २, स्वाभिमानी शेतकरी संघटना एक अशी ५९ सदस्य संख्या होती. भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कोरे व उपाध्यक्षपदाचे डोंगरे यांना प्रत्येकी ३५ मते मिळाली. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार गोरगौंड व उपाध्यक्षपदाचे पाटील यांना प्रत्येकी २२ मते मिळाली.