Maharashtra Special / पूरग्रस्त भागातील मुलींच्या विवाहासाठी मदत करणार, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोठी घोषणा

राज्यातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याचे आव्हानही केले

दिव्य मराठी वेब

Sep 03,2019 09:50:00 PM IST

मुंबई- कोल्हापूर आणि सांगलीमधील पूर बाधित भागातील यावर्षी होणाऱ्या मुलींच्या लग्नात जमेल तेवढी मदत करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व मोठ्या दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहनही चंद्रकांत पाटलांनी केले.
या निर्णयामुळे पूरग्रस्त भागातील जनतेला दिलासा मिळणार आहे.

सांगली कोल्हापूरमध्ये गेल्या महिन्यात पावसाने थैमान घातले होते. याठिकाणी आलेल्या पूरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले. आता पूर ओसरला असला तरी संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. दरम्यान, अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजा आणि सर्वस्व गमावलेल्या पालकांसमोर आपल्या मुलींचे विवाह कसे करायचे, असा प्रश्नही निर्माण झाला होता. ही समस्या नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता या मुलींच्या विवाहाची जबाबदारी आपण उचलू असे सांगितले.

X
COMMENT