चंद्रपूर / प्रेयसीच्या शोधात निघालेल्या ‘त्या’ वाघाचा मृत्यू; आखलेल्या बचाव मोहिमेवरही प्रश्नचिन्ह

...अन् त्याने पुलावरून उडी मारली 
 

प्रतिनिधी

Nov 08,2019 08:11:14 AM IST

नागपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील जुना कुनाडा गावात शिवना नदीपात्रात अडकलेल्या वाघाचा अखेर मृत्यू झाला. बुधवारी सकाळपासून प्रेयसीच्या शोधात निघालेल्या या वाघाला वाचवण्याची सुरू असलेली मोहीम अंधार पडल्यामुळे संध्याकाळी थांबवण्यात आली होती. गुरुवारी पुन्हा मोहीम सुरू होण्याआधीच वाघाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे वन्यप्रेमी हळहळले. तर दुसरीकडे मोहीम अर्धवट सोडल्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


क्रेनवरच केला हल्ला : वाघ अडकलेल्या ठिकाणी जाणे अत्यंत कठीण असल्याने क्रेनची मदत घेण्यात आली. क्रेनला पिंजरा बांधून नदीत सोडला. त्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या. परंतु वाघाने पिंजऱ्यावरच हल्ला केला. पिंजऱ्याचा काठ त्याच्या जबड्याला लागला होता, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी दिली. पिंजऱ्याचे दार बंद झाल्यामुळे तो तिथून काही अंतर समोर गेला. तिथपर्यत पिंजरा नेणे शक्य नव्हते. शवविच्छेदन अहवालात श्वासनलिकेत पाणी गेल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद आहे. वाघाच्या नाकावर आणि पोटावर आघात झाले होते. तसेच अंतर्गत रक्तस्रावही झाला होता.


अडीच वर्षांत ५३ वाघांचा मृत्यू :

कुंपणांत सोडलेला वीजप्रवाह, शिकार, हद्दीची झालेली लढाई यासह नैसर्गिक कारणांमुळे अडीच वर्षात विदर्भात सुमारे ५३ वाघांचा मत्यू झाला आहे. १ जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१९ या अडीच वर्षातील हे मृत्यू आहेत. या ५३ पैकी ३१ वाघांचा मृत्यू नैसर्गिक आहे. तर पाच वाघांचा मृत्यू वेगवेगळ्या अपघातांत झाला.१७ वाघांची शिकार झाली. शिकार करण्यात आलेल्या वाघांत २ नोव्हेंबर १७ रोजी ठार करण्यात आलेल्या “अवनी’ वाघिणीचाही समावेश आहे.


एकीकडे मृत्यू तर दुसरीकडे दहशत... :

एकीकडे कपारीत अडकलेल्या वाघाचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे वर्धा जिल्ह्यातील आगरगावसह सात गावात गेल्या दीड महिन्यांपासून वाघाची दहशत अाहे. वाघाचा बंदोबस्त करावा म्हणून आगरगावातील गावकऱ्यांनी िवधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशाराही दिला होता.

X
COMMENT