आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत विजयासाठी चंद्रशेखर राव 75 ब्राह्मणांकडून करवून घेताहेत यज्ञ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - तेलंगणचे मुख्यमंत्री व टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव हे दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी महायज्ञ करवून घेत अाहेत. हा दोन दिवसांचा यज्ञ रविवारी सिद्दीपेट जिल्ह्यातील एर्रावलीस्थित राव यांच्या जमिनीवरच सुरू झाला. सोमवारी हा राज श्यामला महायज्ञ पूर्णाहुतीने संपन्न होईल. या कामात राव यांना त्यांची पत्नी शोभा व संपूर्ण कॅबिनेट मदत करत अाहे. हा यज्ञ विशाखाचे शारदापीठाधिपती स्वरूपनादेंद्र सरस्वती यांच्यामार्फत हाेत असून, त्यांनी यासाठी विविध राज्यांतून ७५ ब्राह्मणांनाही बाेलावले अाहे.

 

यज्ञानंतर राव हे राज्यात निवडणूक प्रचार सुरू करणार अाहेत. तेलंगणच्या विकासासाठी हा यज्ञ केला जात असल्याचे टीअारएसच्या नेत्यांचे म्हणणे अाहे, तर असे १०० यज्ञ करूनही राव हे या वेळी जिंकणार नाहीत, असा टाेला काँग्रेसने हाणला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...