वर्ल्ड मीडिया -चंद्राच्या अपूर्ण सफरीतही भारताचा विजय
वृत्तसंस्था
Sep 08,2019 09:57:45 AM ISTबंगळुरू - गेल्या ६० वर्षांत केवळ ६० टक्के चांद्रमोहिमा यशस्वी झाल्या आहेत. अमेरिकी अंतराळ संस्था नासाने हा दावा केला आहे. सहा दशकांत एकूण १०९ चांद्रमोहिमा झाल्या. त्यापैकी ६१ यशस्वी, तर ४८ अयशस्वी ठरल्या. इस्रायलने गेल्या वर्षी फेब्रुवारीत चांद्रमोहीम सुरू केली होती, परंतु एप्रिलमध्ये त्यांचे यान नष्ट झाले. १९५८ ते २०१९ पर्यंत भारतासोबत अमेरिका, सोव्हिएत संघ (रशिया), जपान, युरोपीय संघ, चीन व इस्रायलनेही चांद्रमोहीम सुरू केली. पहिल्यांदा चांद्रमोहिमेची योजना अमेरिकेने १७ ऑगस्ट १९५८ रोजी तयार केली होती. परंतु अमेरिकेच्या हाती यश लागले नव्हते. रशियाने ४ जानेवारी १९५९ रोजी चांद्रमोहिमेत यश संपादन केले. रशियाचा तो सहावा प्रयत्न होता. ऑगस्ट १९५८ ते नोव्हेंबर १९५९ पर्यंत अमेरिका व सोव्हिएत संघाने १४ मून मिशन सुरू केले. त्यात रशियाचे तीन प्रयत्न यशस्वी ठरले होते. जुलै १९६४ मध्ये अमेरिकेच्या रेंजर-७ मिशनचा प्रयत्न काही अंश यशस्वी ठरला. या मोहिमेतून चंद्राचे जवळील छायाचित्र टिपता आले होते. अपोलो-११ हे अमेरिकेची महत्त्वाची मोहीम होती. त्याद्वारे पहिल्यांदाच मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले होते. केवळ अमेरिका व रशियाने १९५८ ते १९७९ पर्यंत मोहिमांचा सपाटा लावला होता. २१ वर्षांत ९० वेळा मोहिमा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर जपान, युरोपीय संघ, चीन, भारत व इस्रायलने या क्षेत्रात पाऊल ठेवले. १९९० पासून आतापर्यंत अमेरिका, जपान, भारत, युरोपीय संघ, चीन व इस्रायलने एकूण १९ मोहिमा काढल्या.
ऑर्बिटर सुरक्षित, वर्षभर डेटा पाठवेल
इस्रोचे एक अधिकारी म्हणाले, चंद्राच्या १०० किमीवरील कक्षेत पोहोचलेल्या चांद्रयान-२ चे ऑर्बिटर सुरक्षित आहे. अर्थात चांद्रयान-२ पूर्णपणे निकामी झालेले नाही. २ हजार ३७९ किलो ग्रॅमचे ऑर्बिटर एक वर्षापर्यंत चंद्राला परिक्रमा करेल. त्यात आठ संशोधक पेलोड रिमोट सेन्सिंगच्या साह्याने चंद्राला डेटा पाठवतील. ते चंद्राच्या बाह्य वातावरणाचाही अभ्यास करेल. या मोहिमेचे ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांनी सांगितले.
वर्ल्ड मीडिया -चंद्राच्या अपूर्ण सफरीतही भारताचा विजय
> अमेरिकेचे न्यूयाॅर्क टाइम्स: संपूर्ण यशामध्ये आणखी वेळ लागेल
चांद्रयान-२ च्या विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर इस्राेच्या नियंत्रण कक्षात शांतता पसरली. उपस्थित सर्वजण इस्राेचे अध्यक्ष के. सिवन यांचा उत्साह वाढवत हाेते. हे चांद्रयान-२ चे अंशत: अपयश आहे. संपूर्ण यशासाठी आणखी वेळ लागेल.
> ब्रिटनचे बीबीसी: हा प्रयाेग हाेता, प्रयाेग यशस्वी हाेईलच असे नव्हे
विक्रम लँडरमुळे भलेही निराशा आली. परंतु चंद्राच्या अपूर्ण स्वारीतही भारताचा विजय आहे. भारताने आधीही ऑर्बिटर पाेहाेचवले हाेते. या वेळी ऑर्बिटर अत्याधुनिक आहे. हा प्रयाेग हाेता. प्रत्येक प्रयाेग यशस्वी हाेताेच, असे नसते.
> पाकचे डाॅन : उपग्रह बाजारातही अग्रेसर राहू इच्छिताे
भारताच्या अंतराळ कार्यक्रमामुळे झटका बसला. ताे आशियातील तिसरी माेठी अर्थव्यवस्था आहे. उपग्रहाच्या बाजारपेठेतही भारताला अग्रेसर राहण्याची इच्छा आहे. चांद्रयान-२ यशस्वी हाेण्याची भारतास अपेक्षा हाेती.
माेहिमेच्या यशाचे श्रेय टीमलाच द्या
टीम प्रमुख अपयशाची जबाबदारी स्वत: घेतात. परंतु माेहिमेच्या यशाचे श्रेय टीमला देतात. व्यवस्थापनाचा हाच सर्वाेत्तम धडा आहे. ही गाेष्ट मी पुस्तकांतून नव्हे अनुभवातून शिकली.
- डाॅ. एपीजे अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती