आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chandrayaan 2: ISRO Chandrayaan 2 Vikram Lander Today Updates; NASA Finds ISRO Vikram Lander On Moon

चेन्नईच्या अभियंत्याने चंद्राच्या छायाचित्रांतील फरक सांगितला, नासाने विश्लेषण करून अवशेष विक्रमचे असल्याचा केला खुलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ८७ दिवसांनंतर इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेतील लँडरचा सुगावा लागला
  • ...इस्रोचे मात्र मौनच, याबाबत काहीही सांगण्यास संस्थेचा स्पष्ट नकार

चेन्नई - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-२ मोहिमेतील लँडर विक्रमचा २.१ किमी अंतरावर असताना संपर्क तुटल्यानंतर ८७ दिवसांनी त्याचा सुगावा लागला. चेन्नईचे संगणक प्रोग्रॅमर आणि मेकॅनिकल अभियंता षण्मुग सुब्रमण्यम यांनी सर्व पुराव्यांचे विश्लेषण केल्यानंतर अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने लँडरचे अवशेष सापडले असल्याच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. 


ज्या ठिकाणी विक्रम लँडर वेगाने चंद्रावर आदळले आणि त्याचे तुकडे एक किमीच्या परिसरात विखुरले आहेत, त्या ठिकाणची चंद्राची छायाचित्रे मंगळवारी नासाने प्रसिद्ध केली आहेत. नासाचे ऑर्बिटर एलआरओने ही छायाचित्रे काढली आहेत. नासाने या शोधात मदत केल्याबद्दल सुब्रमण्यम (शान) यांचे आभार मानले आहेत. नासा किंवा इस्रोशी संबंध नसतानाही शान यांनी लँडर कसे ओळखले हे स्वत: शान यांनी दै. भास्करला सांगितले. 
शान यांच्या शोधामुळे सिटिझन सायन्सच्या शक्यतांना चालना मिळेल : नासा 
नासाच्या शोध अभियान योजनेचे दप्तर प्रमुख नुजौद फहून मेरेन्सी यांनी म्हटले की, शानच्या लँडर शोधामुळे सिटिझन सायन्सच्या शक्यतांना चालना मिळेल.

> नासाने चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यात विक्रमचे अवशेष हिरव्या रंगाच्या ठिपक्यांनी दाखवले. निळ्या ठिपक्यांनी विक्रम आदळल्यानंतर फरक दर्श‌‌वला आहे. तर शानने जेथे अवशेष शोधले त्या जागी एस असे लिहिले आहे.
 

नासाने षण्मुगला ई-मेल करून लिहिले...

आपल्या माहितीच्या आधारे आम्ही त्या स्थानाची बारकाईने पाहणी केली आणि आम्हाला विक्रमचे तुकडे सापडले. नासा या शोधाचे श्रेय तुम्हाला देते... अभिनंदन!षण्मुग म्हणाले - १६ दिवस रोज ७ तास एक-एक पिक्सेल पाहिले


मला पहाटे चार वाजता नासाचा एक ई-मेल आला. त्यात नासाने नमूद केले होते, ‘ एलआरओ पथकाने शोधाला दुजोरा दिला आहे. तुमच्या माहितीनुसार आमच्या पथकाने शोध घेतला तेव्हा लँडरचे चंद्रावर आदळण्याचे स्थान आणि त्याच्या विखुरलेल्या अवशेषांची माहिती मिळाली. नासा याचे सर्व श्रेय तुम्हाला देते. मात्र, याबाबत संपर्क साधण्यात विलंब झाल्याबद्दल दिलगीर आहोत. परंतु, सर्व काही पडताळणी करण्यासाठी वेळ हवा होता. आता प्रसारमाध्यमे तुम्हाला या शोधाबाबत विचारतील. हा मेल वाचल्यानंतर मी तत्काळ माझ्या टि्वटर अकाउंटवर (पहाटे सुमारे साडेचार वाजता)  नासाकडून आलेले पत्र टि्वट केले आणि टि्वटर हँडलवर आपल्या स्टेटसमध्ये - आय फाउंड विक्रम लँडर असे जोडले. अंतराळाबाबत आवड असल्याने लँडर हरवल्यानंतर मीही त्यासंबंधीची छायाचित्रे पाहू लागलो. नासाने १७ सप्टेंबरला या स्थानावरील फोटो जारी केला होता. तो १.५ जीबीचा होता, मी तो डाऊनलोड केला आणि सहजपणे निरीक्षण सुरू केले. इस्रोच्या लाइव्ह टेलिमेट्री डेटानुसार विक्रम लँडरचा अंतिम वेग आणि स्थितीनुसार संभाव्य क्षेत्र दोन चौरस किमी होते. त्यामुळे एक-एक पिक्सेलचे स्कॅनिंग केले. नासाच्या एलआरओ कॅमेऱ्याची क्षमता १.३ मीटर प्रति पिक्सेल आहे 
म्हणजेच १.३ मीटरचे छायाचित्र एका ठिपक्याच्या रूपात तो कॅमेरा टिपू शकतो. १७ सप्टेंबरपासून ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत रोज ६ ते ७ तासापर्यंत छायाचित्रांची तपासणी केली. तीन ऑक्टोबरला मला लक्षात आले की तो विक्रमचाच तुकडा आहे. मी टि्वट केले की, याच ठिकाणी विक्रम चंद्रावरील मातीत रुतून बसले आहे. समन्वयकाच्या साहाय्याने नासालाही ही विस्तृृत माहिती ई-मेलद्वारे पाठवली. नासाच्या एलआरओने ११ नोव्हेंबरला याच ठिकाणची नवी छायाचित्रे आल्यानंतर त्याच ठिकाणच्या डिसेंबर २०१७ मध्ये घेतलेल्या छायाचित्रांशी पडताळणी केली. तेव्हा माझा शोध योग्य असल्याचे दिसले. मी अवशेषांचा एकच तुकडा शोधू शकलो. मात्र नासाने तीन तुकडे शोधले आहेत.

बातम्या आणखी आहेत...