chandrayan 2 / चांद्रयान-२ लँडर विक्रम चंद्रापासून अवघ्या ३५ किमी कक्षेत पोहोचले

विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया ७ सप्टेंबरच्या रात्री १ ते २ दरम्यान सुरू होईल

वृत्तसंस्था

Sep 05,2019 08:00:00 AM IST

बंगळुरू - चांद्रयान-२चे लँडर विक्रमची कक्षा दुसऱ्यांदा यशस्वीरीत्या बदलण्यात आली असून हे लँडर आता चंद्राच्या अगदी जवळ पोहचले आहे. इस्रोनुसार, बुधवारी पहाटे ३.४५ वाजता लँडरचे इंजिन चालू करण्यात आले. ९ सेकंद ते चालू होते. या प्रक्रियेत विक्रम लँडर आता चंद्राच्या अगदी जवळ म्हणजे ३५ आणि १०१ किमी अशा परिभ्रमण कक्षेत पाेहचले. यादरम्यान, ऑर्बिटर चंद्रापासून ९६ किमी ते १२५ किमी या कक्षेत परिभ्रमण करेल. लँडर सोमवारी ऑर्बिटरपासून विभक्त झाल्यानंतर त्याच्या कक्षेत प्रथमच मंगळवारी बदल करण्यात आला होता. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया ७ सप्टेंबरच्या रात्री १ ते २ दरम्यान सुरू होईल. हे लँडर १.३० ते २.३० दरम्यान चंद्रावर उतरेल.

X
COMMENT