Mission Chandrayan-2 / मिशन चांद्रयान-2 : इस्त्रोने पूर्ण केला चांद्रयान-2 चा सराव, सोमवारी या वेळेला होणार प्रक्षेपण

15 जुलै रोजी प्रक्षेपणाच्या 56 मिनिटांपूर्वी तांत्रिक बिघाडामुळे थांबवले होते प्रक्षेपण
 

दिव्य मराठी वेब

Jul 21,2019 03:59:11 PM IST

नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने चांद्रयान-2 चा सराव पूर्ण केला आहे. भारताचे दुसरे चंद्र मिशन 22 जुलै दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धनव स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होणार आहे. इस्त्रोने ट्वीटरवरून ही माहिती दिली.

रॉकेटमध्ये होती गॅस गळती, पण आता ती व्यवस्थित आहे
15 जुलैच्या रात्री चांद्रयान-2 मिशन सुरु होण्याच्या 56 मिनिटांपूर्वी याचे प्रक्षेपण पुढे ढकलण्याची घोषणा इस्त्रोने ट्वीट करून दिली होती. प्रक्षेपणाच्या ठीक अगोदर लॉन्चिंग व्हीकल सिस्टममध्ये बिघाड झाला होता. यामुळे चांद्रयान-2चे प्रक्षेपण रद्द आल्याचे इस्त्रोचे सहायक डायरेक्टर (पब्लिक रिलेशन) बी.आर. गुरुप्रसादर यांनी सांगितले होते.

नियोजित वेळेत पोहोचणार चांद्रयान -2
विशेष बाब म्हणजे प्रक्षेपणाची तारीख पुढे ढकलल्यानंतरही चांद्रयान-2 नियोजित तारखेला म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर दाखल होणार आहे. लँडर आणि रोव्हर यांनी नियोजित वेळापत्रकानुसार काम करावे यासाठी चांद्रयान-2 चंद्रावर ठरलेल्या वेळेवर पोहचवण्यात येणार आहे. हा वेळ वाचवण्यासाठी आता चांद्रयान पृथ्वीची एक प्रदक्षिणा कमी मारणार आहे. चांद्रयान 5 चकरा मारून चंद्रावर जाणार होते पण आता 4 चकरा मारणार आहे. चंद्रावर सूर्यप्रकाश जास्त असलेल्या ठिकाणी याची लँडिंग करणार आहे. 21 सप्टेंबरनंतर सूर्यप्रकाश कमी होण्यास सुरुवात होणार आहे. लँडर-रोव्हरला 15 दिवस काम करायचे आहे. यामुळे ते वेळेवर पोहोचणे गरजेचे आहे.


चांद्रयान-2 चे वजन आहे 3,877 किलो
भारताच्या सर्वात शक्तीशाली GSLV Mark-III रॉकेटने चांद्रयान-2चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या रॉकेटमध्ये तीन मॉड्यूल ऑर्बिटर, लँडर(विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) हे असणार आहेत. यावेळी चांद्रयान-2 चे वजन 3.877 किलो आहे. हे चांद्रयान-1 च्या वजनापेक्षा तीन पटीने जास्त आहे. लँडरमधील रोव्हरची गती 1 सेमी प्रति सेकंद राहणार आहे.


ऑक्टोबर 2018 मध्ये चांद्रयान-2 चे प्रक्षेपण टाळले होते
इस्त्रो ऑक्टोबर 2018 मध्ये चांद्रयान-2चे प्रक्षेपण करणार होते. पण याची तारीख बदलून 3 जानेवारी आणि नंतर 31 जानेवारी करण्यात आली होती. नंतर इतर कारणांमुळे हे प्रक्षेपण 15 जुलैपर्यंत टाळण्यात आले. यादरम्यान करण्यात आलेल्या बदलांमुळे चांद्रयान-2 चे वजन वाढले. अशात GSLV Mark-III मध्ये काही बदल करण्यात आले आहेत.


ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर करणार हे काम
यान चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर ऑर्बिटर एक वर्ष पृथ्वी आणि लँडरमध्ये संवाद साधण्याचे काम करणार आहे. तसेच चंद्राच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करणार आहे. यामुळे चंद्राचे अस्तित्व आणि विकासाबद्दल माहिती मिळेल. लँडर आणि रोव्हर चंद्रावर एक दिवस (पृथ्वीचे 14 दिवस) काम करणार आहेत. चंद्रावर भूकंप येतात का नाही हे तपासणे लँडरचे काम असणार आहे. तर रोव्हर चंद्रावरील खनिज घटकांबाबत माहिती मिळवण्याचे काम करणार आहे.

X
COMMENT