Home | National | Other State | chandrayaan 2 Mission will be launched on July 15

"चांद्रयान-2' 15 जुलैला झेपावणार, 54 दिवसांचा दीर्घ प्रवास...शेवटची 15 मिनिटे जिकिरीची

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 13, 2019, 08:45 AM IST

चंद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवला जाईल, आतापर्यंत कोणत्याच देशाने त्या भागावर लँडिंग केली नाहीये

 • chandrayaan 2 Mission will be launched on July 15

  बंगळुरू - चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या दिशेने भारताने दुसरी महत्त्वपूर्ण मोहीम आखली असून १५ जुलै रोजी इस्रो चांद्रयान-२चे प्रक्षेपण करेल. हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या खनिजांची तसेच पाण्याच्या उपलब्धतेची माहिती घेईल. यापूर्वी आॅक्टोबर २००८ मध्ये इस्रोने आपली पहिली मोहीम फत्ते केली होती. यानंतर ११ वर्षांनी पुन्हा एकदा भारत चंद्राच्या दिशेने झेपावत आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, चांद्रयान-२चे प्रक्षेपण १५ जुलै रोजी पहाटे २.५१ वाजता केले जाईल.


  ५४ दिवसांचा प्रवास
  चांद्रयान-२ प्रक्षेपणानंतर ५३-५४ दिवसांनी चंद्राच्या पृष्ठभागावर ६ किंवा ७ सप्टेंबरला दाखल होईल. पृष्ठभागावर हे यान सुरक्षित व यशस्वीपणे उतरणे हे अत्यंत जिकिरीचे काम असेल. चांद्रयान-२ ३० किमी उंचीवरून पृष्ठभागाकडे झेपावेल. यासाठी १५ मिनिटे वेळ लागेल. हा कालावधी अत्यंत आव्हानात्मक असेल.


  १६ दिवसांत पाच प्रदक्षिणा
  प्रक्षेपणानंतर चांद्रयान-२ पुढील १६ दिवसांत पृथ्वीला पाच प्रदक्षिणा घालेल. यानंतर ६ सप्टेंबरला चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. रोव्हर बाहेर पृष्ठभागावर येण्यास किमान चार तास लागतील. १ सेंमी प्रति सेकंद या गतीने रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर प्रवास करेल. यादरम्यान, १५ ते २० दिवस रोव्हरच्या माध्यमातून माहिती घेतली जाईल.


  सर्व पेलोड्स स्वदेशी : चांद्रयान-२मधील सर्व पेलोड स्वदेशी आहेत. यापूर्वीच्या चांद्रयान-१ च्या ऑर्बिटरमध्ये युरोपचे ३ व अमेरिकेचे २ पेलाेड्स होते.
  प्रकल्पाचा एकूण खर्च : १००० कोटी रुपये. यात चांद्रयानाचे ६०३ कोटी, जीएसएलव्हीचे ३७५ कोटी.
  दक्षिण धु्वावर उतरणार : इस्रोनुसार चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असून चंद्राच्या या भागात अद्याप कोणत्याही देशाचे यान उतरलेले नाही.
  एकूण वजन ३८७७ किग्रॅ. : ऑर्बिटर -२३७९ किग्रॅ, लँडर -१४७१ किग्रॅ., रोव्हर -२७ किग्रॅ.


  चांद्रयान-२चे तीन प्रमुख भाग : मून ऑर्बिटर सॅटेलाइट, लँडर आणि रोव्हर चांद्रयान-२चे तीन प्रमुख भाग असतील. याला ऑर्बिटर, लँडर (िवक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) अशी नावे देण्यात आली आहेत.


  चौथा देश : ही मोहीम पूर्णपणे यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया व चीननंतर चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर उतरवणारा भारत चौथा देश ठरेल.

 • chandrayaan 2 Mission will be launched on July 15
 • chandrayaan 2 Mission will be launched on July 15

Trending