आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chandrayaan 2 Moon Mission: ISRO Chandrayaan 2 Weighs 3 Times More Than Chandrayaan

मिशन चांद्रयान-2 : चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी आज निघणार भारत, पहिल्यांदाच चंद्रावर राेव्हर उतरवणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीहरिकाेटा - सतीश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपक स्थळ-२ वर चांद्रयान-२ ला नेण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जीएसएलव्ही मार्क-३ अग्निबाणात इंधन भरले आहे. या अग्निबाणाच्या सर्वात वरच्या भागात चांद्रयान-२ ठेवले आहे. १४-१५ जुलैच्या रात्री २.५१ वाजता हे प्रवासावर निघेल. ६-७ सप्टेंबरला ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यावर भारत असे यश मिळवणारा पहिला देश हाेईल. साेव्हिएत रशिया, अमेरिका व चीन चंद्रावर पाेहाेचले आहेत.राष्ट्रपती काेविंद कार्यक्रमात सहभागी हाेतील. 


चंद्राचा दक्षिण ध्रुव का महत्त्वाचा? : चंद्राचा दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुवापेक्षा माेठाच नव्हे तर तेथील मोठमाेठ्या खड्ड्यांत(क्रेटर) अंधार असताे. लँडर व राेव्हर दक्षिण ध्रुवावर दाेन क्रेटरदरम्यान मैदानात लँड करेल. चांद्रयान-१ने तिथे बर्फ असल्याचा शाेध लावला हाेता. मात्र, चंद्राच्या उत्पत्तीबाबत खूप काही जाणून घेणे बाकी आहे.


रात्री २.५१ वा. प्रक्षेपण : चांद्रयानाचा खर्च ६०३ काेटी रु., स्पेसक्राफ्टचा ३७५ काेटी रु.
भारताच्या सर्वात शक्तिशाली राॅकेट जीएसएलव्ही मार्क-३ ने प्रक्षेपण
हा अग्निबाण (राॅकेट) १७ मिनिटांतच चांद्रयानास पृथ्वीच्या १७० किमीपासून ३८००० हजार किमीच्या  कक्षेत साेडेल.


ऑर्बिटर
हा चंद्राला प्रदक्षिणा घालत राहील. लँडर व राेव्हरवर लक्ष ठेवेल. राेव्हरकडून मिळालेली माहिती इस्राे सेंटरला पाठवेल. हे चंद्रापासून १०० किमीवर माेबाइल कमांड सेंटर असेल.


लँडर (विक्रम)
हे चंंद्रावर उतरेल. याचे नाव इस्राेचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावर ठेवले आहे. हे १५ दिवस शास्त्रीय प्रयाेग करेल. हा तिरंगा घेऊन जाईल. ६५० वॅट वीजनिर्मितीची याची क्षमता आहे. हे आॅर्बिटर व राेव्हशी थेट संपर्कात राहील.


दक्षिण ध्रुवावर उतरेल
सूर्यप्रकाशात चंद्रावर उतरेल. उतरल्याच्या १५ मिनिटांनंतर छायाचित्रे पाठवण्यास सुरुवात करेल.


राेव्हर (प्रज्ञान)  
राेव्हरला ६ चाके आहेत. अशाेक चक्राच्या धर्तीवर तयार केले आहे. राेव्हर ५०० मीटरपर्यंत चालेल. हे चंद्राचा पृष्ठभाग, वातावरण व मातीचे परीक्षण करेल.


चांद्रयान प्रवासाची माहिती देताहेत इस्राेचे चेअरमन
आॅर्बिटर सुरुवातीचे १६ दिवस पृथ्वीला ५ परिक्रमा घालेल. यानंतर ५ दिवस चंद्राकडे जाईल. चंद्राला ४ परिक्रमा करेल. १०० किमी अंतरावर चंद्राच्या वृत्तीय कक्षेत पोहोचेल व पुढील २७ दिवस तिथेच परिक्रमा घालेल. यानंतर लँडर ऑर्बिटरपासून विभक्त होईल व पुढील ४ दिवस चंद्राला परिक्रमा घालत अंतर कमी करत येईल. हा जेव्हा ३० किमीच्या अंतरावर पोहोचेल तेव्हा तो १५ मिनिटांत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. ही सर्वात महत्त्वाची वेळ आहे, कारण याआधी भारताने हे काम केले नाही.’ - के. सिवन, चेअरमन इस्राे