आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रयान-2 : विक्रमवरून 17 रोजी जाणार नासाचा अॉर्बिटर, फोटो पाठवणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन/नवी दिल्ली - भारताच्या चंद्रयान-२ मोहिमेत चंद्रावर गेलेल्या विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आता नासा या अमेरिकी संशोधन केंद्राने मदत करण्याचे ठरवले आहे. नासाचे अॉर्बिटर १७ सप्टेंबर रोजी चंद्रावरील विक्रम लँडर असलेल्या ठिकाणावरून जाईल. यानंतर विक्रम लँडरची स्थिती आणखी स्पष्ट होईल. त्याच्याशी संपर्क करण्यात यशही मिळू शकते. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्यापूर्वी सुमारे २.१ किमी अंतरावरच त्याच्याशी संपर्क तुटला होता. त्याच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेस फ्लाइट  नाऊने नासाच्या ऑर्बिटरचे प्रकल्प शास्त्रज्ञ नोआह पेत्रो यांच्या हवाल्याने म्हटले, ऑर्बिटरकडून जारी करण्यात येणाऱ्या इस्त्रोच्या विक्रम लँडरच्या स्थितीचे विश्लेषण करण्यास मदत मिळेल. विक्रमशी लँडरशी संपर्क साधण्याचे इस्त्रोचेही प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

एलियन शोधणाऱ्या शास्त्रज्ञांना मिळाले 100 सिग्नल्स
बीजिंग |एलियनच्या जगतातील संकेताच्या शोधार्थ असलेल्या शास्त्रज्ञांना  अंतराळात  १०० हून अधिक सिग्नल्स मिळाले आहेत. चीनमधील नव्या विशालकाय “फास्ट’ टेलिस्कोपने त्यांच्या स्फोटाचे आवाज ऐकले. फास्ट टेलिस्कोप हे जगातील खूप सूक्ष्म आवाज एेकणारे उपकरण आहे. २९ ऑगस्ट रोजी त्यांना अंतराळात अनेक स्फोटाचे आवाज ऐकू आले होते. हे स्फोट फास्ट रेडिओ बस्टर्सपासून झालेे. फास्ट रेडिओ बर्स्टर्स आकाशगंगापासून बाहेरच्या आकाशात मिळालेली चमक असते.