आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांद्रयान-2 ने चंद्राचा पहिला फोटो पाठवला, 7 सप्टेंबर रोजी पृष्ठभागावर उतरणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -चांद्रयान 2 ने बुधवारी चंद्राचा पहिला फोटो पाठवला. हा फोटो चांद्रयान-2 च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागापासून 2650 किमी उंचीवरून घेतल्याची माहिती इस्त्रोने ट्वीट करून दिली. यानाला चंद्राच्या कक्षेत पूर्णपण स्थापन होण्यास अर्धा तास लागल्याचे इस्त्रोने सांगितले. दरम्यान चांद्रयान-2 मंगळवारी सकाळी 9.02 वाजता चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. 
23 दिवस पृथ्वीच्या प्रदक्षिणा मारल्यानंतर यानाला चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यास 6 दिवस लागले. चांद्रयान-2 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या निर्धारित जागी दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.