चांद्रयान-2 / चांद्रयान मोहीम ९९.५% यशस्वी, १४ दिवस प्रज्ञानशी संपर्क ठेवणार; ०.०००६% प्रवास शिल्लक होता, इस्रो प्रमुखांची माहिती

ज्या क्षणांची भीती होती त्याच वेळेस संपर्क तुटला 
 

अनिरुद्ध शर्मा

Sep 08,2019 07:35:00 AM IST

बंगळुरू - चांद्रयान-२ मोहीम ९९.५% यशस्वी राहिल्याचे इस्रोने स्पष्ट केले. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी शनिवारी सांगितले की, लँडर व रोव्हरचे चंद्राच्या पृष्ठभागावर १४ दिवसांचे मिशन होते. या काळात त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरूच राहतील. संपर्क झाला तर पेलोड ऑपरेट करता येतील व डाटा मिळू शकेल. दरम्यान, ऑर्बिटर त्याता शोध सुरूच ठेवेल. त्याच्या माध्यमातून पूर्ण चंद्राचा हाय रिजोलेशन मॅप तयार करता येईल. शुक्रवारी रात्री चांद्रयान-२ चे लँडर विक्रम चंद्रापासून २.१ किमीवर असताना त्याचा संपर्क तुटला होता.

ज्या क्षणांची भीती होती त्याच वेळेस संपर्क तुटला
संपर्क तुटण्यापूर्वी चांद्रयान-२ चा प्रवास ०.०००६% शिल्लक होता. २२ जुलैला प्रक्षेपित झालेल्या चांद्रयानाने ४७ दिवसांत पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे ३,८४,००० किलोमीटर अंतरापैकी यानाने ३,८३,९९८ किलोमीटरचा प्रवास नियोजनानुसार पूर्ण केला. पृष्ठभागापासून फक्त २.१ किलोमीटर असताना लँडरशी संपर्क तुटला. लँडिंगचे हे अखेरचे क्षण दहशतीची १५ मिनिटे असल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले होते.

इस्रोचे अध्यक्ष के. सिवन भावनावश झाले तेव्हा मोदी यांनी गळाभेट घेत धीर दिला : शास्त्रज्ञांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जाण्यास निघाले तेव्हा त्यांना निरोप देताना इस्रोचे अध्यक्ष के. सिवन भावनावश झाले. तेव्हा मोदींनी त्यांची गळाभेट घेतली. त्यांच्या पाठीवर थोपटत त्यांना प्रयत्न सुरू ठेवण्याचे सांगितले.

X
COMMENT