Chandryan -2 / Good News: ऑर्बिटरने विक्रम लँडरचा पत्ता लावला; थर्मल इमेज देखील घेतली, आता संपर्क साधण्याचा नव्याने प्रयत्न

चांद्रयान-2 मध्ये नवी उमेद, लँडरचा पत्ता लागला -ISRO

दिव्य मराठी वेब

Sep 08,2019 02:39:17 PM IST

नवी दिल्ली - चांद्रयान-2 च्या लँडरचा पत्ता लागल्याची माहिती रविवारी इस्रो प्रमुखांनी जाहीर केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ऑर्बिटरने लँडर विक्रमचा केवळ पत्ताच लावला नाही, तर थर्मल इमेज सुद्धा घेतल्या आहेत. परंतु, लँडरशी अद्यापही संपर्क झाला नाही. आता इस्रोकडून नव्याने संपर्क साधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लवकरच पुन्हा संपर्क साधला जाईल अशी उमेद के. सिवन यांनी व्यक्त केली आहे.

नवी उमेद...
चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या इस्रोच्या प्रयत्नाला शनिवार पहाटे झटका बसला. चंद्रयान-2 चे लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघे 2 किमी अंतरावर असताना संपर्क तुटला. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, लँडर विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे जात होता. पृष्ठभाग स्पर्श करण्याच्या ऐनवेळी लँडरशी संपर्क तुटला. यानंतर देशभरातील नागरिकांना धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अख्खा देश इस्रोच्या पाठीशी थांबला होता. आता या नवीन वृत्ताने इस्रोच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.

X
COMMENT