आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chandrayaan 2 Rocked The Space, 2.43 Minutes In The Afternoon, GSLV Mark III Rocket Successfully Launched

भारतासाठी अभिमानाचा क्षणः चांद्रयान -2 अवकाशात झेपावले, 17 व्या मिनिटांत योग्य कक्षेत प्रवेश, इ्स्रोत जल्लोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीहरिकोटा - चांद्रयान-2 आज (22 जुलै) दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी अवकाशात झेपावले. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV Mark-III रॉकेट हे उड्डाण करण्यात आले. पृथ्वीच्या चार प्रदक्षिणा मारल्यानंतर हे यान चंद्राच्या कक्षेत दाखल होणार आहे. दरम्यान इस्त्रोने शनिवारी चांद्रयान-2ची रंगीत तालीम केली होती. यातील अडचणी, त्रुटी पूर्ण केल्यानंतर सोमवारी चांद्रयान अवकाशात झेपावले.  लॉन्चिंगच्या 17 मिनिटांतच योग्य कक्षेत प्रवेश केला आणि यशस्वी वाटचाल सुरू  झाली. चांद्रयानाचे प्रक्षेपण यशस्वी ठरताच इस्रोच्या संशोधकांनी एकच जल्लोष केला. आता पुढील 23 दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेतच राहणार आहे.

 

 

15 जुलै रोजी चांद्रयान-2चे प्रक्षेपण होणार होते. पण काही तांत्रिक अडचणींमुळे हे उड्डाण पुढे ढकलण्यात आले. इस्रोने एका आठवड्यात चांद्रयान-2 मधील सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्या.  ऑर्बिटरसोबत लँडर(विक्रम) आणि रोवर (प्रज्ञान) सोबत पाठवण्याचे भारताचे पहिले मिशन आहे.  या मिशनवर 978 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

 

15 जुलै रोजी थांबवले होते प्रक्षेपण
15 जुलैच्या रात्री चांद्रयान-2 मिशन सुरु होण्याच्या 56 मिनिटांपूर्वी याचे प्रक्षेपण पुढे ढकलण्याची घोषणा इस्त्रोने ट्वीट करून दिली होती. प्रक्षेपणाच्या ठीक अगोदर लॉन्चिंग व्हीकल सिस्टममध्ये बिघाड झाला होता. यामुळे चांद्रयान-2चे प्रक्षेपण रद्द आल्याचे इस्त्रोचे सहायक डायरेक्टर (पब्लिक रिलेशन) बी.आर. गुरुप्रसादर यांनी सांगितले होते.

 

चांद्रयान-2 चे वजन आहे 3,877 किलो 
भारताच्या सर्वात शक्तीशाली GSLV Mark-III रॉकेटने चांद्रयान-2चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या रॉकेटमध्ये तीन मॉड्यूल ऑर्बिटर, लँडर(विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) हे असणार आहेत. यावेळी चांद्रयान-2 चे वजन 3.877 किलो आहे. हे चांद्रयान-1 च्या वजनापेक्षा तीन पटीने जास्त आहे. लँडरमधील रोव्हरची गती 1 सेमी प्रति सेकंद राहणार आहे.

 

ऑक्टोबर 2018 मध्ये चांद्रयान-2 चे प्रक्षेपण टाळले होते
इस्त्रो ऑक्टोबर 2018 मध्ये चांद्रयान-2चे प्रक्षेपण करणार होते. पण याची तारीख बदलून 3 जानेवारी आणि नंतर 31 जानेवारी करण्यात आली होती. नंतर इतर कारणांमुळे हे प्रक्षेपण 15 जुलैपर्यंत टाळण्यात आले. यादरम्यान करण्यात आलेल्या बदलांमुळे चांद्रयान-2 चे वजन वाढले. अशात GSLV Mark-III मध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

 

ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर करणार हे काम 
यान चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर ऑर्बिटर एक वर्ष पृथ्वी आणि लँडरमध्ये संवाद साधण्याचे काम करणार आहे. तसेच चंद्राच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करणार आहे. यामुळे चंद्राचे अस्तित्व आणि विकासाबद्दल माहिती मिळेल. लँडर आणि रोव्हर चंद्रावर एक दिवस (पृथ्वीचे 14 दिवस) काम करणार आहेत. चंद्रावर भूकंप येतात का नाही हे तपासणे लँडरचे काम असणार आहे. तर रोव्हर चंद्रावरील खनिज घटकांबाबत माहिती मिळवण्याचे काम करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...