आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chandrayan 2 |Bollywood Stands With ISRO After Disconnecting Signals Lander Vikram From Earth

चंद्रयान-2 : अमिताभ बच्चनने आपल्या कवितेतून दिली इस्रोला हिंमत; इतर कलाकारांनी अशाप्रकारे केले इस्त्रोचे सांत्वन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - चंद्रयान-2 च्या लँडर विक्रमचा फक्त 69 सेकंदपूर्वी पृथ्वीशी संपर्क तुटला. यानंतर देशातील प्रत्येक नागरिकांनी इस्रोची हिंमत वाढवण्याचे काम करत आहे. यामध्ये बॉलीवूड कलाकार देखील मागे राहिले नाही. प्रत्येक जण आपल्या अंदाजात इस्रोच्या शास्त्रज्ञांना इथपर्यंत पोहचल्यामुळे शुभेच्छा देत आहेत. अमिताभ बच्चन यांनी अग्निपथ चित्रपटाचा डायलॉग लिहित इस्रोच्या शास्त्रज्ञांचे सांत्वन केले आहे. 


कलाकारांना अशाप्रकारे दिले इस्त्रोला प्रोत्सा
हन 
 

बिग बींनी लिहिले अनेक संदेश 
अमिताभ बच्चन यांनी एकापाठोपाठ 4 ट्वीट करत लिहिले की, अभिमान कधी पराभवाचा सामना करत नाही. आपला अभिमान आपला विजय. आम्हाला तुमचा अभिमान आहे इस्त्रो. तू ना थके गा कभी, तू ना मुड़ेगा कभी, तू ना थमेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ...
 
अमिताभ यांनी दुसऱ्या एका ट्वीटमध्ये लिहिले की, आज एक नवीन सुर्योदय झाला आहे. आपण चंद्रावर पुन्हा विजय प्राप्त करू.
चंद्रयानाने पार केलेल्या अंतराची मोजणी करत बिग बींनी त्यांचा चाहता केके गजराज सिंगचे ट्वीट शेअर करत लिहिले की, चंद्र 3,84,400 किमी दूर आहे आणि आपण 2.1 किमीपूर्वी अयशस्वी झाले. म्हणजे हे अंतर फक्त 0.0005463% होते. इतकेच नाही तर हे अपयश नवीन सुरुवातीचा आधार आहे. या अपयशातही यशाचा स्वाद आहे. आमचे वैज्ञानिक आणि इस्रोचे आभार.
 

   

अक्षय कुमार म्हणाला - प्रयोगाशिवाय विज्ञान नाही
अक्षय कुमारने ट्वीट करत लिहिले की, प्रयोगाशिवाय विज्ञान नाही. प्रयोग कधी यशस्वी होतो तर कधी त्यातून शिकायला मिळते. इस्त्रो च्या शास्त्रज्ञांना सलाम. चंद्रयान 2 लवकरच चंद्रयान 3 साठी प्रवेश करेल याचा आम्हाला अभिमान आणि आत्मविश्वास आहे.
 
 
 

   

अजय देवगन म्हणाला -  देश तुमच्या पाठीशी आह
अजय देवगनने इस्त्रो च्या वैज्ञानिकांसाठी लिहिले की, गर्व आणि आशेने देश तुमच्या पाठीशी उभा आहे. धन्यवाद इस्त्रो. 
 

   

दलेर मेहंदी - एक मोठे पाऊल
दलेर मेहंदीने ट्वीट करत लिहिले की, आपण भारतीय शास्त्रज्ञांच्या पाठीशी उभे आहोत. चांद्रयान 2 इस्रोचे एक मोठे पाऊल आहे. 
 

   


अनिल कपूरने इस्रोला यशाचा खजिना म्हणून उल्लेख के
ला
अनिल कपूरने लिहिले की, पंतप्रधान मोदी खरंच म्हणाले होते की, 'इस्त्रो यशाचा खजिना आहे. जेव्हा आमच्या अंतराळ कार्यक्रमाची बातमी येते तेव्हा सर्वोत्कृष्ट येणे बाकी आहे. ही नेहमीच उल्लेखनीय कामगिरी राहील. भारताला चांद्रयान-2 च्या टीमवर गर्व आहे.'
 

अदनान सामी म्हणाला की ते अतुलनीय आहे
अदनान सामीने लिहिले की, पृथ्वी आणि चंद्राच्या 384,000 किमी अंतरापैकी आपण 383,998 किमी पार केले आणि फक्त 2 किमी अंतर बाकी होते. हे अतुलनीय आहे. आपण चंद्राच्या अगदी जवळ गेलो होतो याचा गर्व आहे. आपल्या शास्त्रज्ञांना त्यांची प्रतिभा, साहस आणि दृढ संकल्पासाठी शुभेच्छा. तोपर्यंत...जय हिंद!
 

 

बातम्या आणखी आहेत...