आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्राच्या पृष्ठभागावर धडकल्याने तुटला चांद्रयानाचा संपर्क : नेदरलँडच्या अंतराळवीराचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्रोने ७ सप्टेंबरला हे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. - Divya Marathi
इस्रोने ७ सप्टेंबरला हे छायाचित्र प्रसिद्ध केले होते.

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली चंद्राच्या पृष्ठभागावर पडलेल्या चांद्रयान -२ च्या लँडर विक्रमाची अवस्थेवर मंगळवारी चौथ्या दिवशीही सस्पेन्स कायम होते. इस्रोने मंगळवारी पहिल्यांदाच अधिकृतरीत्या विक्रम सापडल्याची माहिती ट्विट करून दिली. मात्र, त्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले नाही. दरम्यान, नेदरलँडचे अंतराळवीर सीस बासा यांनी नासाची जेट प्रॉपल्शन लॅबचा डाटा आणि इस्त्रोचा सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेला डाटाची तुलना करून दावा केला की, लँडरचा संपर्क चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किमी वर नव्हे, तर पृष्ठभागावर धडक दिल्याने तुटला होता. इस्रोने २.१ किमी अंतराच्या वर संपर्क तुटल्याचा दावा केला होता. सीस बासा नेदरलँडच्या एस्ट्राॅन  (नेदरलँड इन्स्टिट्यूट ऑफ रेडिअो एस्ट्रॉनॉमी) संस्थेसाठी जगभरातील स्पेसक्राफ्टची ट्रॅिकंग करतात. ७ सप्टेंबरला ते ड्विंगलू टेलिस्कोप आब्जर्व्हेरीतून चांद्रयान - २ च्या लँडिंगवर नजर ठेवून होते. मंगळवारी चार रंगाच्या रेषांचा एक ग्राफ ट्विट करत त्यांनी सांगितले की, जांभळी रेषा रेडिओटेलिस्कोप  डॉप्लर कर्व्हची, तर नारंगी रेषा चांद्रयान - २ च्या लँडरच्या नासा जेपीएलद्वारे दिलेल्या हॉरिजॉन ट्रॅजेक्टरीची आहे. त्यांनी लिहिले की, याच्या तुलनेने स्पष्ट आहे की, लॅडर चंद्राच्या पृष्ठभागावर धडकल्याने दुर्घटनाग्रस्त झाला होता. त्याच्याशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यांनी शनिवारीच डॉप्लर कर्व्हचे छायाचित्र प्रसिद्ध करत दु:ख व्यक्त केले होते की, लँडरची क्रॅश लँडिंग झाली आहे.

ऑर्बिटरच्या तीन कॅमेऱ्यांमधून इस्रोला मिळाले लँडरचे छायाचित्र
इस्रोच्या माजी वैज्ञानिकाने सांगितले की, लँडिंगच्या वेळी संपर्क तुटल्यानंतर लाइव्ह प्रसारणादरम्यान ऑर्बिटरकडून मिळालेले जे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते त्यात लँडरने स्कॅनिंगच्या माध्यमातून उतरण्याची जागा निवडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया १०० मीटर आधी सुरू व्हायला हवी होती. संपर्क तुटला त्या वेळी हाॅरिझाँटल वेग ४८.१ मीटर प्रतिसेकंद (जी शून्य असायला हवी होती) व व्हर्टिकल वेग ५९ मीटर प्रतिसेकंद होती. म्हणजेच ऑर्बिटरने घेतलेल्या छायाचित्रानंतर पुढील एक ते दोन सेकंदादरम्यान  लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर धडकला असेल. ऑर्बिटरने काढलेले छायाचित्र प्रसिद्ध करून इस्रोने स्थित स्पष्ट करावी असेही त्यांनी म्हटले अाहे. विशेष म्हणजे ऑर्बिटरमध्ये लावण्यात आलेल्या ८ उपकरणांपैकी तिघांत कॅमेरे आहेत. त्यांच्या मदतीने इस्रोला लँडरचे छायाचित्र मिळाले आहे. सूत्रांनी सांगितले की, बंगळुरूच्या जवळ ब्यालालू येथील इंडियन डीप स्पेस नेटवर्क तसेच नासाचा जेट प्रोपल्शन लॅबचा कॅलिफोर्निया, मेड्रिड आणि कॅनबरा येथील रेडिओ अँटिनाचाही वापर केला जात आहे. त्यातून चंद्रावर सर्च सिग्नल पाठवले जात आहेत. मात्र, ८ लाख किलोमीटर (येणे - जाणे) अंतर पार केल्यानंतरही लँडर सक्रिय झाल्याची माहिती मिळाली नाही.