आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैकीदारापासून चाेर झालेल्यांना हटवण्याचे काम काँग्रेस करणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


साक्री - भाजपचे सरकार ठकबाज आहे. या सरकारने सर्वसामान्य जनतेला प्रचंड आश्वासने दिली. परंतु सत्ता मिळाल्यावर कुठलीच आश्वासने पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली नाही, महिलांना न्याय दिला नाही, युवकांना रोजगार नाही, गरिबांना कुठलाच आधार नाही, त्यामुळे शेतकरी, युवक, महिला, गरीब आदींसह सर्वसामान्य नागरिकही सरकारवर नाराज आहे. म्हणून चाैकीदारापासून चाेर झालेल्यांना आपल्याला दिल्लीतून हटवायचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी वामसी चाँदरेड्डी यांनी केले. जनसंपर्क अभियान व काँग्रेसच्या तालुका कमिटीचा आढावा घेताना ते बाेलत हाेते. 

 

साक्रीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात काँग्रेसतर्फे जनसंपर्क अभियान व तालुका काँग्रेस कमिटीचा आढावा बैठक बुधवारी झाली. याप्रसंगी जिल्हा प्रभारी शोभा बच्छाव, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, आमदार डी. एस. अहिरे, माजी खासदार बापू चौरे, जि. प. सभापती मधुकर गर्दे, जिल्हा बँक संचालक हर्षवर्धन दहिते, पंचायत समिती सभापती गणपत चौरे, साक्रीचे उपनगराध्यक्ष राजेंद्र टाटिया, जि. प. सदस्य उत्तमराव देसले, प्रभाकर बच्छाव, मधुकर बागुल, पंचायत समिती गटनेते उत्पल नांद्रे, पं. स. सदस्य प्रकाश अकलाडे, विश्वास बागुल, माजी तालुकाध्यक्ष दिलीप काकुस्ते, युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रदीप नांद्रे, माजी उपसभापती संजय ठाकरे, माजी जि. प. सदस्य चंदुलाल जाधव, दर्यावगिरी महंत, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिरीष सोनवणे, लक्ष्मीकांत शहा, सलीम पठाण, याकुब पठाण, एकनाथ गुरव, युवक ऋषिकेश मराठे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल बिरारीस, तालुकाध्यक्ष कमलाकर सोनवणे, महेश अहिरराव, मुन्ना देवरे, अक्षय सोनवणे, पेरेजपूरचे सरपंच मनोज देसले, धनराज गांगुर्डे, असिफ शहा, दिनेश सोनवणे, प्रवीण देवरे उपस्थित होते. या वेळी वामसी चाँदरेड्डी यांनी सांगितले की, पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात सरकार देणार होते परंतु सरकारने गरीब जनतेला पंधरा लाख दिले नाही पण अंबानी व अदाणीसारख्या धनाढ्य लोकांच्या खिश्यात पंधरा हजार करोड घातले. त्यामुळे जनसामान्यांत सरकार विरोधात नाराजी आहे. सरकारचे दिवस आता कमी राहिले आहेत. आपल्या क्षेत्रातील लोकसभेची जागा सर्वाधिक मताधिक्क्याने जिंकून राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी यशस्वी प्रयत्न सर्वांना करावयाचा आहे, असेही त्यांनी उपस्थिताना आवाहन केले.

 

श्यामकांत सनेर यांनी सांगितले की,  मध्य प्रदेश, राजस्थान व इतर राज्यांच्या विधानसभेत काँग्रेसला विजय मिळाला. त्याच धर्तीवर संघटनेत विविध बदल करून विजयाची हीच पद्धत बूथ पातळीपर्यंत राबवायची आहे. शिवाजी दहिते यांनी सांगितले की, लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाने संघटनेच्या विविध स्तरावर निरीक्षक नेमण्याची पद्धत अवलंबली आहे. आमदार डी. एस. अहिरे म्हणाले की, तालुक्यात पक्षसंघटन चांगले आहे. पक्ष संघटन अधिकाधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वन बूथ टेन युथ ही संकल्पना चांगली असून बूथपातळीवर आता कार्य होणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर माजी खासदार बापू चौरे, हर्षवर्धन दहिते, दिलीप काकुस्ते व कमलाकर सोनवणे आदींनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रदीप नांद्रे यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...