आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपात येणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी पक्षाचे स्वरूप बदलणार नाही- चंद्रकांत पाटील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्यात आमची ताकद चांगलीच वाढत आहे. अनेकजण आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. 90 टक्के भाजपचे लोक राज्यात विविध पदावर काम करत आहेत. युती होणार आहे, आमच्या एकट्याच्या 200 जागा येणार असल्या तरी सत्तेत निम्मा निम्मा वाटा होईल. असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलत होते.
 
पुण्यात पत्रकार श्रमिक संघाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानिमीत्त ते बोलत होते. ते म्हणाले," राज्यात आमची ताकद चांगलीच वाढत आहे. अनेकजण आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. तसेच राज्यात 90 टक्के जागांवर आमचेच लोक आहेत. यामुळेच आमची ताकद आणखीन वाढेल. शिवाय आमच्या एकट्याच्या 200 जागा येणार असल्या तरी सत्तेत निम्मा वाटा होईल. आमची शिवसेनेसोबतची युती अभेद्य आहे."
 
"मुख्यमंत्री पदाबाबत मला माहिती नाही. अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्यात काय ठरले माहीती नाही, पण ते जो निर्णय घेतील तो सर्वमान्य असेल. शरद पवार यांनी तीन जण पक्ष सोडून गेले याचा धसका घेतलाय, अजून जाणारे आहे त्याची तयारी ठेवावी." असा टोलाही त्यांनी शरद पवारांवर लगावला.