आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन : चांग ई-4 यानाने पाठवली चंद्राच्या मागील बाजूची छायाचित्रे; न पाहिलेल्या चंद्राची 360 डिग्री छाया 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनच्या चांग ई-४ अंतरिक्ष यानाने चंद्रावर उतरल्यानंतर तेथील पहिली छायाचित्रे पाठवली आहेत. ३६० डिग्रीतील ही छायाचित्रे चीनी राष्ट्रीय अंतरिक्ष प्रशासनाने (सीएनएसए) शुक्रवारी जारी केली आहेत. चीन समाचार न्यूज एजन्सीज शिन्हुआनुसार हे छायाचित्र अंतराळयान लँडरच्या सर्वात उंच भागावर लावलेल्या कॅमेऱ्यातून घेण्यात आलेली आहेत. यानंतर त्यांना क्वेक्वियाओ उपग्रहाद्वारे पाठविण्यात आली. 

 

यात सांगण्यात आले की, या छायाचित्रांमुळे शास्त्रज्ञांना अंतराळ यानाच्या आजूबाजूला असलेल्या भूभागावर तसेच मैदानाच्या नैसर्गिक रूपातील प्रारंभिक विश्लेषणास मदत मिळेल.

 

बातम्या आणखी आहेत...