आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकमध्ये परिवर्तन : बगदादमध्ये रक्तरंजित संघर्ष थांबला; आबालवृद्ध उद्यानांत रमले..

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बगदाद- इराकमधील परिस्थिती बदलू लागली आहे. १५ वर्षांपर्यंत गृहयुद्ध व दहशतवादी संघटना इसिसच्या ताब्यात असलेला इराक वर्षभरापूर्वी त्यांच्या ताब्यातून मुक्त झाल्याने देशातील नागरिक आता परिवर्तनाची अनुभूती घेत आहेत. याच कारणामुळे कधी काळी बाॅम्बस्फाेटांनी उद्धवस्त झालेल्या शहरांतून काढता पाय घेऊन देश साेडणारे आता पुन्हा परतत आहेत. यात राजधानी बगदादचा चेहरामाेहरा वेगाने बदलत आहे. शहरातील नागरिक मुलांसाेबत फिरण्यासाठी उद्यानांत जाऊ लागले असून, सर्वात जास्त गर्दी जावरा पार्कमध्ये हाेत आहे. हे उद्यान गतवर्षी पुन्हा उघडण्यात आले हाेते. या उद्यानात मनोरंजन पार्क व प्राणिसंग्रहालयही आहे., माेहंमद समीरसारखे कलाकार बहुरूपी बनून मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच विद्यापीठांतील वातावरणही बदलल्याने विद्यार्थिनी सेल्फी घेताना आढळून येत आहेत. उशिरापर्यंत बाजारपेठा गजबजू लागल्यात. 

 

पुढाकार : २०३५ पर्यंत मेगा सिटी
- बगदादला २०३५ पर्यंत मेगा सिटी बनवले जाईल. यात एक काेटी नागरिक राहू शकतील.  
- महिनाभरापूर्वी बगदादमधील उच्च सुरक्षा असलेला ग्रीन झाेन १५ वर्षांनंतर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.

 

७ लाख लाेकांनी गमावले प्राण-
- इराकमध्ये २००३ पासून गृहयुद्ध सुरू झाले हाेते. त्यात २०१८ पर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त लाेकांना प्राण गमवावे लागले
- २०१४ मध्ये अमेरिकेच्या सैन्याने सूत्रे हाती घेतली व गतवर्षी इसिसच्या ताब्यातून मुक्त केले.  

बातम्या आणखी आहेत...