Maharshtra News / New Cap; महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात बदल, नव्या अतिरिक्त टोपीचा समावेश


पोलिसांच्या डोक्यावर आता बेसबॉल प्रकारातील टोपी दिसणार आहे.

दिव्य मराठी

Apr 25,2019 05:16:00 PM IST

मुंबई- महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात बदल करण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांच्या डोक्यावर आता बेसबॉल किंवा क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारी टीपी येणार आहे. राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या स्वाक्षरीचे परिपत्रक पोलिस विभागातर्फे जारी करण्यात आले आहे.


परिपत्रकानुसार, यो टीपीची पकड घट्ट आहे, त्यामुळे काम करताना टोपी डोक्यावरून खाली पडण्याची शक्यता नाहीये. तसेच या टोपीमुळे चेहणऱ्याचे उन्हापासून संरक्षण होते. या टोपीचा अतिरिक्त टोपी म्हणून गणवेशात समावेश करण्यात आला आहे.


सर्व प्रमुखांनी आपल्या मनुष्यबळाच्या संख्येप्रमाणे या टोप्या बनवून घ्याव्यात आणि त्या सर्व पोलिस शिपाई ते पोलिस उपनिरीक्षकांपर्यंत पोहचत्या करण्याचे सांगण्यात आले आहे. नवीन टोपी तयार करताना यामध्ये घटक कार्यालयाच्या स्तरावर कोणतेही बदल करण्यात येऊ नयेत शिवाय टोपीचा खर्च गणवेशासाठी आकारण्यात येणाऱ्या 5167 रूपयांमधूनच करण्यात यावा असे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

X