आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जय श्री राम बोलणे बंगाली संस्कृतीचा भाग नाही, घोषणा मारहाणीसाठी केल्या जातात'- नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ञ अमर्त्य सेन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- नोबल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमात एक वक्तव्य केले. ते म्हणाले-' आजकाल देशभरात ‘जय श्री राम’ घोषणांचा वापर लोकांना मारण्यासाठी केला जात आहे. ही बंगाली संस्कृती नाहीये. मी याआधी कधीच बंगाली नागरिकांना ‘जय श्री राम’ घोषणा देताना पाहीले नाही. मला वाटते की, याचा बंगाली संस्कृतीशी काहीच संबंध नाहीये.'

 

मां दुर्गेची तुलना राम नवमीशी करता येत नाही.'- सेन
सेन म्हणाले-"मी याआधी कधीच राज्यात राम नवमी उत्सव साजरा होताना पाहिला नाही. पण आता हे लोकप्रिय झाले आहे. मी माझ्या चार वर्षीय नातीला विचारले, तुझा आवडता देव कोण आहे? ती म्हणाली- मां दुर्गा. मा दुर्गेची तुलना राम नवमिसोबत नाही केली जाऊ शकत. जर एखाद्या विशिष्ट धर्माचे लोक मुक्तपणे फिरण्यास घाबरत असतील, तर हा गांभीर्याने घेण्याचा मुद्दा आहे" सेन यांचे हे विधान दोन पक्षांमध्ये पार्किंगवरून झालेल्या वादानंतर आले आहे.

 

जुन्या दिल्लीमध्ये हौज काजी परिसरात मां दुर्गेचे मंदिर पाडण्यात आले होते. मे महिन्यात भाटपाराच्या परगन जिल्ह्यात झालेल्या एक घटनेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जींनी ‘जय श्री राम’च्या घोषणांवर नाराजी व्यक्त केली होती. मागील काही महिन्यांपांसून तृणमूल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद होत आहेत.

 

भाजयुमो कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अश्रु धुर सोडला
दुसरीकडे शुक्रवारी पश्चिम बर्दवान जिल्ह्यात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली, यात चारजण जखमी झाले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आसनसोल नगरपालिकेसमोर अनेक मुद्यांवर प्रदर्शन भाजयुमोची योजना होती. पण त्यांनी याबाबत प्रशासनाकडून परवानगी घेतलेली नव्हती.


कथितरित्या भाजयुमो कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडं आणि काचेच्या बाटल्या फेकल्या. त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी अश्रु धुर सोडला. आसनसोलच्या लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या बाबुल सुप्रियोंनी 2014 आणि 2019 ला निवडणूक जिंकली आहे.

 

ममता म्हणाल्या- आम्ही 2021 निवडणुकीत परत येऊ
तृणमूल काँग्रेस सूप्रीमो ममता बनर्जींंनी शुक्रवारी बांकुरा आणि झाडग्राम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठकी घेतल्या. त्यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर स्थानिक नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्या पुढे म्हणाल्या- मला विश्वास आहे की, 2021 च्या विधानसभा निडणूकीत आपण चांगली कामगिरी करू.
 

बातम्या आणखी आहेत...