आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल, शिसोदियांसह १३ अामदारांविरुद्ध आरोपपत्र; दिल्लीच्या सचिवांवर ‘आप’ने केलेल्या हल्ल्याचे प्रकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्य सचिव अन्शू प्रकाश यांच्यावर फेब्रुवारी महिन्यातील कथित हल्लाप्रकरणी पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्यासह आपच्या १३ आमदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांच्यासमोर दाखल केलेल्या आरोपपत्रात आम आदमी पार्टीचे आमदार अमनतुल्लाह खान, प्रकाश जारवाल, नितीन त्यागी, रितुराज गोविंद, संजीव झा, अजय दत्त, राजेश ऋषी, राजेश गुप्ता, मदन लाल, परवीन कुमार आणि दिनेश मोहनिया यांची नावे आहेत.  


केजरीवाल, शिसोदिया व इतरांनी मुख्य सचिवांना गंभीर जखमी अथवा मृत्यूबाबत धमकी देण्याचा कट रचला, त्यांचे कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केल्याचे १३०० पानांच्या आरोपपत्र म्हटले आहे. या नेत्यांनी भादंविअंतर्गत शिक्षेस पात्र असणारी कृती  केली आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीवर हल्ला करणे, सार्वजनिक सेवेतील अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हेगारी बळाचा वापर करून इजा पोहोचवणे आदींचा यामध्ये समावेश आहे. संबंधितांविरुद्ध कलम १४९ अंतर्गत ठेवण्यात आले आहेत. या अंतर्गत एखाद्या जमावातील व्यक्तीकडून गुन्हा घडला असेल तर अशा जमावातील प्रत्येक व्यक्ती या गुन्ह्यासाठी दोषी धरला जातो. 


केजरीवाल यांची झाली होती तीन तास चौकशी 
दिल्ली पोलिसांनी १८ मे रोजी केजरीवाल यांची तीन तास चौकशी केली होती. १९ फेब्रुवारीच्या रात्री केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी प्रकाश यांच्यावर हल्ला झाला होता. हल्ला झाला तेव्हा केजरीवाल उपस्थित होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी ११ आमदारांची चौकशी केली आहे. अमानतुल्लाह खान व प्रकाश जारवाल या आमदारांना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...