आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JNU घोषणाबाजी प्रकरणी 3 वर्षांनंतर 1200 पानांचे चार्जशीट, कन्हैया-खालीदसह 10 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेएनयूमध्ये 2016 मध्ये दहशतवादी अफजल गुरूच्या स्मरणार्थ घेतलेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा लावल्याचा आरोप 
  • चार्जशीटमध्ये माकप नेते डी राजा यांची मुलगी अपराजिता राजा-अनिर्बान भट्टाचार्य यांच्याशिवाय 7 कश्मिरी विद्यार्थ्यांची नावे 

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी (जेएनयू) मध्ये 2016 मध्ये देशविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी पोलिसांनी 1200 पानांचे चार्जशीट दाखल केले आहे. अफजल गुरुच्या समरणार्थ आय़ोजित कार्यक्रमात ही घोषणाबाजी झाल्याचे आरोप आहेत. पोलिसांनी जेएनयूच्या विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालीद आणि अनिर्बान भट्टाचार्यसह इतर 7 काश्मिरी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. तर इतर 36 आरोपी आहेत. कन्हैय्या कुमारने म्हटले की मी 3 वर्षांनंतर चार्जशीट दाखल केल्या प्रकरणी मोदी आणि पोलिसांचे आभार मानतो. यावरून स्पष्ट होते की, हे पाऊल राजकीय हेतूने उचलेले आहे. 


चार्जशीटमध्ये माकप नेते डी राजा यांची मुलगी अपराजिता राजा, विद्यार्थी परिषदेचा माजी उपाध्यक्ष शहला रशीदसह 36 इतर नावे आहेत. त्यांचे नाव चार्जशीटच्या कॉलम 12 मध्ये आहे. कारण त्यांच्या विरोधात काहीही पुरावा मिळालेला नाही. पण त्यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. पटियाला कोर्टात दाखल चार्जशीटवर मंगळवारी सुनावणी होईल. 

 
न्यायव्यवस्थेवर विश्वास- कन्हैया
कन्हैया कुमारने याबाबत म्हटले, मी मोदी आणि पोलिसांचे आभार मानतो. 3 वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावर चार्जशीट फाइल करण्यावरून स्पष्ट होते की, हे राजकीय हेतूने उचललेले पाऊल होते. मला देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. 

 
राजकीय द्वेषातून झालेले आरोप - डी राजा
माकप नेते डी राजा म्हणाले हे राजकीय द्वेषातून झालेले आरोप आहेत. एआयएसएफवर कोणीही देशविरोधी असल्याचा आरोप करू शकत नाही. तपासासाठी काहीही नाही. आमचे विद्यार्थी कोणत्याही कारवायांमध्ये सहभागी नाहीत. 

 
असे होते प्रकरण.. 
असा आरोप आहे की, जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारीला डाव्या विद्यार्थ्यांच्या गटांनी संसदेवरील हल्ल्याचा आरोपी अफजल गुरू आणि जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) चा को फाऊंडर मकबूल भट यांच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित केला. त्याला कल्चरल इव्हेंट असे नाव देण्यात आले. सायंकाळी 5 वाजता त्याच कार्यक्रमात काही लोकांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. 10 फेब्रुवारीला घोषणाबाजीचा व्हिडिओ समोर आला. दिल्ली पोलिसांनी 12 फेब्रुवारीला घोषणाबाजीच्या आरोपाखाली देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी कन्हैया, खालीद आणि भट्टाचार्य यांना अटकही करण्यात आली होती. नंतर त्यांना जामीन मिळाला. 

 

बातम्या आणखी आहेत...