आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्यांदा ऐव्हरेस्टवर गेलेल्या अनिताने दिला अनमोल सल्ला, म्हणाली-परिस्थितीनुसार बदल केल्यावर यश मिळेल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनीपत(हरियाणा)- ऐव्हरेस्ट सर करणे जेवढे रोमांचक असते तेवढेच धोकादायकही आहे. जगातील या सर्वात उंच शिखरावर चढाई करण्यासाठी जोशासोबत डोके शांत ठेऊन काम करावे लागते. ऐव्हरेस्ट सर करण्यासाठी त्याच तरूणांनी प्रयत्न करायला पाहिजे ज्यांच्यात हाइट-गेन करण्याची क्षमता असेल. यासोबतच त्यांनी काही अॅडव्हांस कँप यशस्विरित्या पूर्ण केलेले असावे. ही शिकवन त्या भारतीय महिला गिर्यारोहक अनिता कुंडूची आहे जिच्या नावावर ऐव्हरेस्ट पर्वत चीन आणि नेपाळ दोन्ही बाजूने सर केल्याचा रेकॉर्ड केले आहे.

 

अनिता आताही ऐव्हरेस्टवर चढाई करत आहे. सध्या त्यांनी बेस कँप 3 यशस्वीरित्या पुर्ण केले आहे. 21 मे सकाळी आठ वाजता शिखरापर्यंत पोहचायचे त्यांचे लक्ष्य आहे. तसेच रात्री एक वाजेपासून कँप 4 कडे चढाई करतील. यादरम्यान सोनीपतच्या रवी ठाकूर यांचा ऐव्हरेस्ट सर करताना मृत्यूवर त्यांनी शोक व्यक्त केला. अनीताने 18 मे 2013 मध्ये ऐव्हरेस्टला नेपाळकडून तसेच, 21 मे 2017 मध्ये चीनच्या बाजूने सर करून हा विक्रम आपल्या नावावर केला होता. या यशामुळे अनिता चौथ्यांदा जगातील सर्वात ऊंच शिखरावर चढाई करण्यासाठी गेल्या आहेत. यावेळी त्या टीम लीडर म्हणून काम करत आहे, त्यांची टिममध्ये विविध देशातील स्पर्धक सहभागी आहेत.


यामुळे होतो गिर्यारोहकांचा अपघात
अनिता यांनी सांगितले की, ऐव्हरेस्ट मोहिमे दरम्यान सर्वात जास्त मृत्यू कडाक्याची थंडी आणि ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे होतात. बर्फाळ प्रदेशात भयंकर थंडीमुळे हात आणि पायांचे स्नायु नष्ट होतात आणि मांस काळे पडून गळू लागते. बर्फवर्षाव आणि भेगांमध्ये पडून सुद्धा गिर्यारोहकांचा मृत्यू होतो. कमी अनुभवी गिर्यारोहक ऑक्सीजनचा आधीच वापर बेस कँपपासूनच सुरू करतात आणि परत येण्यासाठी पाच सिलेंडरची आवश्यकता असते, पण ते आपला ऑक्सीजन आधीच संपवून टाकल्यामुळेही मृत्यू होतो.

 

25 ते 30 लाख रूपये कमीत कमी फिस
अनीता यांच्या माहितीनुसार, जगातील सर्वात ऊंच शिखर ऐव्हरेस्ट सर करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण यासाठी चांगल्या आरोग्यासोबतच चांगले पैसेही मोजावे लागतात. यामध्ये सहभाग घेण्यासाठी 25 ते 30 लाख रूपये सुरूवातीलाच जमा करावे लागतात. कारण एका ऑक्सीजन सिलेंडरची किंमत 25 ते 50 हजारा दरम्यान असते तर पाणी चारशे रूपये लीटरने मिळते.

बातम्या आणखी आहेत...