आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चौधरी यात्रा कंपनी’तर्फे दसरा-दिवाळीच्या सुटीत केरळ-राजस्थान-दार्जिलिंग सहलींचे विक्रमी बुकिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : प्रसिद्ध चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि. तर्फे यंदाही दिवाळीच्या हंगामात भरगच्च यात्रा व सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. भारत दर्शनासह दुबई, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका इ. विदेशी सहलींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिवाळा असल्याने उष्ण प्रदेशात सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. अष्टविनायक दर्शन, महाराष्ट्र दर्शन, कोकण, गोवा, केरळ, दक्षिण भारत दर्शन, स्पेशल तिरुपती दर्शन, कर्नाटक दर्शन, गुजरात दर्शन, स्पेशल राजस्थान, त्रिस्थळी-नेपाळ, दार्जिलिंग, गंगटोक, गंगासागर-जगन्नाथपुरी, म्हैसूर, बंगळुरू, उटी, कोडाईकॅनॉल, अंदमान, लक्षद्वीप, पोखरा, चितवन आदी स्थळांच्या यात्रा लक्झरी बसने व रेल्वेने आयोजित केल्या आहेत.  अष्टविनायक, केरळ सहल दररोज जाणार असून दर दोन-ती दिवसांनी राजस्थान, गोवा, कोकण व दर आठवड्यास दक्षिण भारत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

 
यंदाच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात दीपावली सुटीतील विविध यात्रांचे बुकिंग करण्यासाठी राज्यभरातून यात्रेकरू कंपनीच्या नाशिक कॉर्पोरेट कार्यालयात यासह विभागीय व शाखा कार्यालयांमध्ये गर्दी करत आहेत. तसेच कंपनीने सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई, श्रीलंका व पुढील वर्षी जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेत ही मोठी सवलत दिल्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात्रांच्या अधिक माहिती व बुकिंगसाठी कंपनीच्या कार्यालयांमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन कंपनीचे संस्थापक प्रेमचंद चौधरी व चतुर्भुज चौधरी तसेच संचालक महेंद्रपाल चौधरी व ब्रिजमोहन चौधरी आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...