Maharashtra Special / 'सगळे मिळुन होऊ एक सा‌थ, करु दुष्काळाशी दोन हात', सुजलाम-सुफलाम गावातील घरात बैलगाडीतून आले गौरी-गणपती

बीडमधील चौरे कुटुंबीयांनी साकारला दुष्काळ निवारणावरील देखावा

Sep 06,2019 07:01:00 PM IST

बीड-शहरामधील मोतीमहल परिसरातील चौरे कुटूंबीयांनी यंदाही गौरी-गणपती निमित्त 'सगळे मिळुन होऊ एक सा‌थ, करू दुष्काळाशी दोन हात' असे म्हणत आकर्षक देखावा साकारला आहे. एकत्र कुटूंबातील सर्व सदस्यांनी एक महिन्यापासून देखाव्याची तयारी करत सहा फिरते दे‌खाव्यांचा एकत्रीत साकारले आहेत. देखावा साकारण्यासाठी मिना विलास चौरे, आशा अमोल चौरे, डॉ. सुप्रिया पवार, अनिकेत सालपे, निखिल चौरे, रोहित चौरे, प्रतिक चौरे, रितेश नवले, डॉ. अंकिता चौरे, अभिषेक सालपे यांनी पुढाकार घेतला.


एकाच ठिकाणी सहा हालते देखावे

गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंधारणाचे कामे करावेत, तसेच पाऊस नियोजीत वेळेत पडावा यासाठी वृक्ष संवर्धन कसे करावेत यातून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि पाऊसही पडेल त्यातून शेतीतून शेतकऱ्यांचा भारगोस उत्पन्न मिळेल पर्यायाने शिक्षण, आरोग्य, व्यापार सर्वच दळणवळणाचे व्यवहार सुरळीत चालतील, असे दर्शवणारे एकाच ठिकाणी सहा हालते देखावे चौरे कुटूंबीयांनी साकारले आहेत.

यात श्रमदान करणारे ग्रामस्थ, अधिक बोअरवेलचे प्रमाण किती घातक आहेत हे सांगणारे ग्रामस्थ, वृक्षारोपन व संगोपन विषयी जनजागृती करणारे ग्रामस्थ तसेच शेतामध्ये गोफण फिरवताना शेतकरी, विहिरीतुन पाणी शेंदताना महिला, बैलगाडीतून धान्य बाजारात जाताना आणि गावात जोरदार पाऊस पडत असलेले असे एकूण सहा देखावे आकर्षक आहेत.

चार दिवस पाहण्यासाठी देखावा खुला

सुभाष रोडवरील मोतीमल परिसरात चौरे कुटूंबीयांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी यंदाच्या वर्षी दुष्काळावर मात करणारा देखावा साकारला आहे. रविवार(दि. 8) ते बुधवार(दि. 11) या चार दिवस हा देखावा महिला, युवतींसाठी सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुला राहणार असल्याची माहिती मिना व आशा चौरे यांनी दिली.

X