Home | Business | Gadget | cheap-tablet-computer

फक्त १० हजारात टॅबलेट पीसी!!!

team divya marathi | Update - May 25, 2011, 12:30 PM IST

चीनच्या जी फाइव या कंपनीने अतिशय स्वस्तात टॅबलेट पीसी बाजारात आणणार आहे. अवघ्या १०,००० रुपयांमध्ये हा टॅबलेट पीसी मिळणार आहे.

  • cheap-tablet-computer

    फक्त १० हजारात टॅबलेट पीसी!!!

    टॅबलेट पीसीला गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये टॅबलेट पीसी लॉंच करण्याची स्पर्धाच लागली आहे.पण, टॅबलेट पीसी सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाही. म्हणून चीनच्या जी फाइव या कंपनीने अतिशय स्वस्तात टॅबलेट पीसी बाजारात आणणार आहे. अवघ्या १०,००० रुपयांमध्ये हा टॅबलेट पीसी मिळणार आहे.
    जुनच्या अखेरीस हा पीसी उपलब्ध होईल. अॅण्ड्रॉईड आणि विन्डोज प्लॅटफार्मवर आधारित हा पीसी असेल. कंपनी ७ आणि १० इंच आकाराचे दोन मॉडेल्स सादर करणार आहे. त्यात हायस्पीड इंटरनेट सोबतच वायफाय सुविधाही असेल. अॅपलच्या पाठोपाठ सॅमसंगनेही टॅबलेट पीसी सादर केला. त्यानंतर या क्षेत्रातल्या इतर कंपन्यांनीही टॅबलेट पीसी बाजारात आणले. त्यामुळे नजीकच्या काळात या क्षेत्रात प्राईसवॉर बघायला मिळणार, हे निश्चित.

Trending