आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाँगकाँग, सिंगापूर आणि पॅरिस जगातील सर्वात महागडी शहरे; बंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली सर्वात स्वस्त शहरांत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


न्यूयॉर्क - हाँगकाँग, सिंगापूर आणि पॅरिस ही जगातील सर्वात महागडी शहरे आहेत. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या (ईईयू) वार्षिक सर्वेक्षणात ही शहरे अव्वल ठरली आहेत. गेल्या ३० वर्षांपासून दरवर्षी होत असलेल्या या सर्वेक्षणात प्रथमच तीन शहरे प्रथमस्थानी आली आहेत. 

 


मागील वर्षी महागाईच्या बाबतीत पॅरिस दुसऱ्या स्थानी होते. स्वस्त शहरांबाबतीत भारतातील बंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली यंदा अव्वल १० मध्ये आहेत. व्हेनेझुएलामधील कराकास हे शहर जगात सर्वात स्वस्त आहे. बंगळुरू सर्वात स्वस्त शहर कसे आहे याचे सोदाहरण स्पष्टीकरण यात आहे. 

 

एका महिलेला केशकर्तनासाठी पॅरिसमध्ये ११९.०४ डॉलर खर्च येतो, तर बंगळुरूमध्ये याचसाठी फक्त १४ डॉलर अर्थात १०१० रुपये लागतात. न्यूयॉर्कमध्ये एक किलो ब्रेडसाठी ५७५ रुपये मोजावे लागतात, बंगळुरूत यासाठी ८४ रुपये लागतात. ईईयू जगातील १३३ शहरांतील किमतीच्या तुलनात्मक अभ्यासानंतर श्रेणी जाहीर करते.

 

विविध देशांच्या चलनमूल्यांत सातत्याने होत असलेल्या चढ-उतारामुळे यंदा रँकिंगमध्ये फरक पडला आहे. यामुळेच अर्जेंटिना, ब्राझील, तुर्कस्तान आणि व्हेनेझुएलासारख्या देशांत खर्चाचे प्रमाण घटले आहे. मागील वर्षी व्हेनेझुएलात महागाईचा दर १० लाख टक्क्यांवर पोहोचला होता. तेथे सरकारला नवे चलन सुरू करावे लागले होते. त्यामुळे कराकास शहर जगात सर्वात स्वस्त ठरले आहे. या सर्वेक्षणात अन्न, वस्त्र आणि निवारा यावर जास्त लक्ष दिले जाते. ब्रेड, बिस्कीटसारखे खाद्यपदार्थ, कारच्या किमती, घरांचे भाडे, वाहतूक आणि कपडे यासारख्या १५० हून जास्त वस्तूंच्या किमतींचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. 

 

५ सर्वात महागडी शहरे 
> सिंगापूर (सिंगापूर) 
> पॅरिस (फ्रान्स) 
> हाँगकाँग (चीन) 
> झुरिच (स्वित्झर्लंड) 
> जिनिव्हा (स्वित्झर्लंड) 


५ सर्वात स्वस्त शहरे 
> कराकास (व्हेनेझुएला) 
> दमिश्क (सिरिया) 
> ताश्कंद (उझबेकिस्तान) 
>अलमाती (कझाकिस्तान) 
> बंगळुरू (भारत) 

बातम्या आणखी आहेत...