आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Cheapest Leather Jacket Exploring Factory In Delhi; Branded Jackets At Just Rs 2500

15 हजारांत मिळणारे ब्रँडेड जॅकेट येथे फक्त 2500 रुपयांत, हे आहे भारतातील सर्वात स्वस्त मार्केट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क  - हिवाळा सुरु झाला आहे. कित्तेक शहरात तापमान दहा डिग्री पर्यंत पोहोचले आहे. आता थंडीपासून बचावासाठी स्वेटर आणि आणि जॅकेटची गरज तर पडतेच. बाईक किंवा स्कुटर चालवणाऱ्या लोकांना तर जॅकेटची खूप गरज असते आणि लेदर जॅकेट थंडीपासून बचावासोबतच एक कुल लूकसुद्धा देतात. पण, बाजारात ब्रँडेड जॅकेटची किंमत कमीत कमी 5000 रुपयांपासून सुरु होते आणि केवळ जॅकेटसाठी 5000 रुपये खर्च करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही दिल्लीतल्या ठोक मार्केटमधून हे जॅकेट खरेदी करू शकता. तेथे हे जॅकेट 2500 रुपये किमतीपासून मिळते. महागडया दुकानात 10000 ते 15000 रुपयांना मिळणारे जॅकेटही इथे 2500 रुपयांपासून मिळतात.

 

यामुळे स्वस्त असतात हे जॅकेट... 
दिल्लीच्या मोहोम्मदपूर भागात असलेले साहिल इंटरप्राइजेसचे मालक सलाउद्दीन इदरीसी यांनी सनीतले की, याठिकाणी अशी खूप दुकाने आहेत जिथे हे जाकीट ठोक किमतीत मिळतील. यापैकी बऱ्याच दुकानदारांनी स्वतःची फॅक्टरी सुरू केली आहे. कारण लेदर ठोक किमतीत विकत घेऊन शिवले जाते. त्यामुळे इथले जॅकेट स्वस्त किमतीत मिळतात. 


याचा हा फायदा होतो की ग्राहकाला त्याच्या मनाप्रमाणे हवे तसे जॅकेट शिवून मिळते. जर कुणाला एकसारखेच अनेक जॅकेट हवे असतील तर ही मागणी पूर्ण करणे सोपे जाते. जर जॅकेटची फिटिंग व्यवस्थित नसेल तर जॅकेट आपल्या मापाचे करून घेता येते. तसेच हार्ले डेव्हिडसन, माईलस्टोन यांसारख्या अनेक ब्रँडची जॅकेटही स्वस्त दारात उपलब्ध होतात. या जॅकेटचे लेदरही चांगल्या दर्जाचे असते आणि याची किंमतही 5000 रुपयांपासून असते.

बातम्या आणखी आहेत...