आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फरीदाबाद : शनिवारी 21 वर्षीय युवतीने प्रेमात धोका मिळाल्यामुळे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यारून उडी घेत आत्महत्या केली. जखमी झालेल्या युवतीला रूग्णालयाच दाखल केले. उशिरा रात्री तिचा मृत्यू झाला. युवतीच्या हातावर मेंदीने लिहीलेली सुसाइड नोट आढळून आली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
युवकाशी जुळले होते प्रेमसंबंध
कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने पाटणा येथून पदवीचे शिक्षण घेतले होते. तेथे एका युवकासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. युवकाने लग्नाचे वचन दिले होते पण नंतर लग्न करण्यास नकार दिला. प्रेमात धोका मिळाल्यामुळे युवती गुमसम राहत होती. यामुळे परिवारातील सदस्यांनी तिला फरीदाबाद येथे घेऊऩ आले. पण येथे सुद्धा तणावात होती.
हातावरील मेंदीत लिहीले आत्महत्येचे कारण
युवतीने शनिवारी संध्याकाळच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. आवाज ऐकूनच लोकांनी त्या ठिकाणी गोळा झाले. तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उशिरा रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. युवतीने तिच्या हातावर एक मोबाइल नंबर आणि एका युवकाचे नाव लिहिले होते. सोबतच लिहीले होते की, युवकानेच मे 2018 मध्ये लग्न करण्याचे वचन दिले होते. पण नंतर त्याने माझ्यावरच खोटा आळ घेतला. पोलिस संबंधीत प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.