आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cheating At Petrol Puml, As Petrol Pump Employees Filling Water Instead Of Petrol In Rewa

पेट्रोल संबंधीत समोर आला डोळे उघडणारा व्हिडीओ, बाईक स्टार्ट न होण्यावर मॅकॅनिकने सांगितले धक्कदायक सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडीओ डेस्क - दिवसेंदिवस पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे लोक आधीच हैराण झाले आहेत. पण आता त्यामधील होणारी भेसळीची बाब समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रेवा येथील पेट्रोल भेसळीची बाब समोर आली आहे. येथील नवीन बस स्टँड जवळील पेट्रोल पंपावर नागिरकांना पेट्रोल ऐवजी पाणी देण्यात येत होते. हे प्रकरण समोर येताच पेट्रोल भरणाऱ्या नागरिकांनी पंपावर गोंधळ घातला होता. नागरिकांनी बाटलीत पेट्रोल घेतले असता त्यांना पाणीयुक्त पेट्रोल आढळून आले. घटनास्थळी पोलीस अधिकारी व अन्न विभागाची टीम ताबडतोब परिस्थिती हाताळण्यासाठी आली.

 

पोलिसांत केली तक्रार दाखल
वाहनांमध्ये खराबी आल्यानंतर काही लोकांनी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारदाराने सांगितले की पेट्रोल भरल्यानंतरही बाईक चालविली गेली नाही तेव्हा त्याने मेकॅनिकला सांगितले. तपास केल्यानंतर, असे आढळून आले की टाकीमध्ये पेट्रोलसह पाणी देखील आहे.

 

बंद केला पेट्रोलपंप 
खाद्य विभागाने पेट्रोलचे सँपल तपासणीसाठी पाठविले आहे. नागरिकांचे हित लक्षात घेऊन तपासणीसाठी पाठविलेल्या सँपलचा रिपोर्ट येईपर्यंत पेट्रोलपंपाला टाळे ठोकण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...