आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या : BF ने कवटाळले मृत्यूला, मित्राला मेसेज पाठवून सांगितले - तिला सांग घरी येऊन माझा मृतदेह बघू जा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भटिंडाः एका 22 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विकास असे या युवकाचे नाव असून त्याच्या आईचा आरोप आहे की, एका मुलीमुळे त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. विकासने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या एका मित्राला मेसेज केला होता की, मी सल्फॉसच्या गोळ्या खाल्या आहेत. तिला (प्रेयसी) सांग घरी येऊन माझा मृतदेह बघून जा.  

 

घरी येताच म्हणाला, आई मला वाचव... 
विकास कुमार भटिंडाच्या बीबीवाला चौकस्थित एका बेकरीत कामाला होता. विकासची आई राणी यांनी सांगितल्यानुसार, तो संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घरी आला आणि माझ्या मांडीवर डोके ठेऊन आई मला वाचव, असे म्हणाला. थोड्याच वेळात त्याला उल्ट्या व्हायला लागल्या. मी त्याची बिघडलेली अवस्था बघून शेजारच्यांना बोलावले आणि त्याला रुग्णालयात नेले. बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राणी यांनी सांगितल्यानुसार, एका विवाहित महिलेसोबत गेल्या वर्षभरापासून विकासचे प्रेमसंबंध होते. त्या महिलेने आणि तिच्या कुटुंबीयांनी विकासला त्यांच्या जाळ्यात ओढले होते आणि ते त्याच्याकडून पैसे उकळायचे. 

 

पोलिसांवर कारवाई न करत असल्याचा आरोप... 
राणी यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी अनेकदा विकासला त्या महिलेपासून दूर राहण्यास सांगितले होते.  त्या महिलेमुळेच विकासने आत्महत्या केल्याचे राणी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले आहे. पण पोलिस जबाब लिहून घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. आपल्या मर्जीने पोलिसांनी जबाब लिहून त्यावर त्यांच्या सह्या घेतल्या. पोलिसांनी त्यांना सांगितले की, पोस्टमार्टम झाल्यानंतर अंत्यविधी उरकून टाका. त्यानंतर कारवाई केली जाईल. 

 

आरोपांची चौकशी झाल्यानंतर होईल कारवाई : एएसआई

वर्धमान चौकी पोलिसचे एएसआई भुपिंदर सिंह यांनी सांगितले की, पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे. ही प्रेमप्रकरणातून झालेली आत्महत्या आहे. कुटुंबीयांनी जे आरोप लावले आहेत, त्याची चौकशी झाल्यानंतर आरोपींविरोधात कारवाई केली जाईल. कुटुंबीयांनी जे जबाब दिले आहेत, त्यात कुठलेही फेरबदल करण्यात आलेले नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...