Home | Maharashtra | Pune | Cheating in Pune by ATM card cloning

एटीएम कार्ड क्लाेन करून एक लाखाची पुण्यात फसवणूक

दिव्य मराठी | Update - Sep 07, 2018, 08:06 AM IST

पुण्यातील काेंढवा भागात राहणाऱ्या एका तरुणाचे एटीएम कार्डमधील डाटा क्लाेन करून विविध एटीएम केंद्रांतून अज्ञाताने १ लाख

  • Cheating in Pune by ATM card cloning

    पुणे - पुण्यातील काेंढवा भागात राहणाऱ्या एका तरुणाचे एटीएम कार्डमधील डाटा क्लाेन करून विविध एटीएम केंद्रांतून अज्ञाताने १ लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. याप्रकरणी काेंढवा पाेलिस ठाण्यात विश्मदीपसिंग लांगे (२९, रा. काेंढवा, पुणे) यांनी अज्ञात अाराेपीविराेधात पोलिसांत तक्रार दिली आहे.


    दरम्यान, एटीएम कार्डचे नेमके क्लोनिंग कसे करण्यात आले यासंदर्भात विश्मदीप यांना काहीच माहीत नाही. मात्र, विविध एटीएम केंद्रांतून रक्कम काढण्यात आल्याचे संदेश त्यांच्या मोबाइलवर आल्यानंतर त्यांना याबाबत माहीत झाले. त्यावरून त्यांनी लगेचच पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पाेलिस निरीक्षक एम. एस. कुंभार यांच्यासह त्यांचे पथक तपास करत आहे.

Trending