आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागीदारीचे आमिष दाखवून तरुणाला १५ लाखांचा गंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मोबाइल दुकानावर येणाऱ्या व्यक्तीने मैत्रीचे नाटक करत दुकान मालकाला सराफा व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून १५ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी साईनाथ खंडू जानवळे (२३, रा. जय भवानी नगर) याच्या तक्रारीवरून नितेश घेवरचंद जैन (रा. एन-४) याच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ याचे मोबाइलचे दुकान आहे. 


नितेश हा त्याच्या दुकानावर नेहमी जात होता. मैत्री झाल्यानंतर त्याचा विश्वास संपादन करत दोन वर्षांपूर्वी सोन्या-चांदीच्या व्यापारात भागीदार झाल्यास भरपूर फायदा होईल, असे आमिष दाखवले. त्यानुसार सप्टेंबर २०१६ मध्ये साईनाथने त्याला १५ लाख रुपये दिले. परंतु अनेक महिने उलटूनही व्यवसाय सुरु केला नाही. त्याने फोन केला असता तो बंद होता. साईनाथने नितेश विषयी परिसरातील काही जणांकडे विचारपूस केली असता त्याने अनेकांकडून पैसे घेऊन फसवल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...