Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | cheating of 33 lakhs by Buying a Sari

साडी खरेदी करून ३३ लाखांना गंडा, पुण्याच्या व्यापाऱ्यावर गुन्हा

प्रतिनिधी | Update - Aug 13, 2018, 11:31 AM IST

येथील पश्चिम मंगळवार पेठेतील धूत साडी दुकानात साड्या खरेदी करून ३३ लाखांचा चेक दिला. तो चेक वटला नाही.

  • cheating of 33 lakhs by Buying a Sari

    सोलापूर- येथील पश्चिम मंगळवार पेठेतील धूत साडी दुकानात साड्या खरेदी करून ३३ लाखांचा चेक दिला. तो चेक वटला नाही. पैशाची मागणी केल्यानंतर शिवीगाळ, दमदाटी केली. या प्रकरणी पुण्यातील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दीपक किसनराव जवळकर, रा. पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुरुषोत्तम रामकिसन धूत यांनी जोडभावी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना जानेवारी २०१४ या काळात घडली.


    जवळकर यांची व्यवसायाच्या माध्यमातून ओळख झाली होती. जवळकर यांनी सोलापुरात येऊन सुमारे ३८ लाख रुपयांच्या साड्या खरेदी केल्या. त्यानंतर त्या साड्या सोलापुरातून ट्रकमधून पाठवून देण्यात आल्या. साडी घेऊन गेल्यानंतर काही दिवसांनी धूत यांनी पैशाची मागणी केली. त्यानुसार पाच लाख रुपये बँकेमार्फत दिले. उर्वरित ३६ लाख रुपये यासाठी कोटक महिंद्रा व जळगाव पीपल्स को बॅँकेचे चेक दिले. दोन्ही चेक बाउन्स झाले.

Trending