Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | cheating of 52 lakh in medical admission, charge sheet submitted

वैद्यकीय प्रवेशावरून ५२ लाखांची फसवणूक, दोषारोपपत्र दाखल

प्रतिनिधी | Update - Aug 31, 2018, 11:33 AM IST

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देतो, असे सांगून वेळोवेळी एकूण ५२ लाख रुपये घेतले आणि आर्थिक फसवणूक केली.

  • cheating of 52 lakh in medical admission, charge sheet submitted

    सोलापूर- वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देतो, असे सांगून वेळोवेळी एकूण ५२ लाख रुपये घेतले आणि आर्थिक फसवणूक केली. तसेच, शैक्षणिक नुकसानही केले, अशी फिर्याद विजापूर नाका पोलिसात दाखल झाली होती. या प्रकरणी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले.


    संदीप जवाहर शहा (वय ४१, रा. फुरडे रेसीडन्सी, विजापूर रोड) व कल्पना अनिल पगारे (वय ५३, रा. इंद्रप्रसाद बिल्डिंग, बांद्रा पूर्व) यांनी इतर आरोपींशी संगनमत करून विद्यार्थ्यांची ५२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणी न्यायदंडाधिकारी बी. सी. मोरे यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.
    हे प्रकरण ऑक्टोबर २०१५ पासून सुरू झाले. शहा याने व्यवस्थापन कोट्यातून एमबीबीएसला कमी बजेटमध्ये प्रवेश मिळवून देतो असे खोटे सांगून फिर्यादीकडून २८ लाख रुपये तर साक्षीदार युवराज गायकवाड यांच्याकडून १६ लाख रुपये घेतले. नंतर संदीप शहा याने वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा फार्म परस्पर भरला. फिर्यादीची मुलगी मराठा संवर्गातील असली तरी एसटी संवर्गातून फार्म भरला. यासाठी खोटी व चुकीची माहिती भरली. गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीप शहा व कल्पना पगारे यांना अटक झाली होती. नंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली. या प्रकरणी २६ साक्षीदार तपासण्यात आले तर तीन आरोपी फरार आहेत. आरोपी संदीप शहा तर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. यशश्री तडवळकर तर कल्पना पगारे तर्फे अॅड. प्रशांत नवगिरे काम पाहत आहेत.

Trending