Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Cheating of 85 thousand on the name of loan

कर्जाच्या आमिषाने ८५ हजारांची फसवणूक; मध्य प्रदेशातील दोघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी | Update - Aug 07, 2018, 11:42 AM IST

चौवीस तासांत कर्ज मंजूर करून देतो, दोन टक्के व्याजदर, कर्जाच्या रकमेत ४५ टक्के सूट अशी असे विविध आमिषे दाखवून मध्य प्रदे

 • Cheating of 85 thousand on the name of loan

  सोलापूर- चौवीस तासांत कर्ज मंजूर करून देतो, दोन टक्के व्याजदर, कर्जाच्या रकमेत ४५ टक्के सूट अशी असे विविध आमिषे दाखवून मध्य प्रदेशातील एका फायनान्स कंपनीने ८५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. शीतल भारत निकम (रा. जोडभावी पेठ) यांनी सोमवारी जोडभावी पोलिसात फिर्याद दिली आहे.


  गणपती फायनान्स प्रॉपर्टी पर्सनल फर्मचे एजंट रानू शकले, मॅनेजर विकास मोहन शर्मा (रा. हरदा, मध्य प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत २७ जून २०१८ रोजी एका दैनिकात कमी दरात लोन मिळेल, अशी जाहिरात देण्यात आली होती.


  तसेच ९८९७४२१८६६ हा मोबाइल नंबर देण्यात आला होता. त्यावरून शीतल यांनी संपर्क साधला. आपणास कर्ज मिळेल म्हणून सांगण्यात आले. प्रोसेसिंग फी, जीएसटी, एजंट प्रोसेसिंग फी, अकाउंट वीक ही कारणे दाखवत पैसे भरण्यास सांगितले.


  शीतल यांनी एसबीआय व डफरीन चौकातील ॲक्सिस बँकेत असे एकूण ७३ हजार ७०० रुपये भरले. कालांतराने शीतल यांनी लोन रद्द करण्यासाठी शर्मा याला संपर्क केला. लोन कॅन्सल करता येईल, पण त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र फलटण गल्ली येथे स्वाती सिंग यांच्या नावे असलेल्या अकाउंटमध्ये पैसे भरण्यास सांगितले. काही दिवसांनी संपर्क केला असता काहीच उत्तर मिळाले नाही.


  त्यांच्या बँक अकाउंटमध्येही पैसे जमा झाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक निरीक्षक भुसनूर तपास करीत आहेत. शीतल हे एमआर आहेत. ते आपल्या पत्नीच्या फॅशन डिझायनिंग व्यवसायासाठी कर्ज घेणार होते.

Trending